यावल दि.२१
येथील महाजन गल्लीतील नवभारत गणेश मित्र मंडळाची वार्षिक सभा गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आली सभेत अध्यक्षपदी रितेश बारी तर उपाध्यक्षपदी उज्वल कानडे यांची व सदस्यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रमोद यशवंत नेमाडे हे होते व प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष राकेश कोलते व भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे व नगरसेवक डॉ.कुंदनदादा फेगडे,धीरज महाजन व नितीन महाजन,राजू करांडे यांच्या उपस्थिती मध्ये मंडळाची कार्यकरणीची सर्वानुमते निवड करण्यात आली त्या मध्ये अध्यक्ष रितेश बारी,उपाध्यक्ष उज्वल कानडे,खजिनदार स्नेहल फिरके, सहखजिनदार ओम महाजन,सचिव भोजराज ढाके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व पी.टी.चोपडे सर यांनी सूत्र संचालन केले,राष्ट्रासाठी शहीद झालेले सैनिक यांच्यासह समाजातील कै.रमेश विठू पाटील कुटुंब नायक पाडळसा,याचे व यावल शहर व तालुक्यातील जे स्री - पुरुष नागरिकांचे निधन झाले अशा सर्व लोकांना दोन मिनिटं स्तब्द उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व डॉ.कुंदनदादा फेगडे यांनी मनोगत व्यक्त केले.सभेचे सूत्र संचालन भूषण फेगडे यांनी केले उपस्थित नवभारत गणेश मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा