यावल दि.२०
रावेर विधानसभा मतदार संघातील सर्व स्तरातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहणारे समाजसेवक डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात २ ते ३ हजार महिलांनी उपस्थिती देऊन स्वामी सोपान कानेरकर यांच्या प्रेरणादायी प्रवचनाला तथा व्याख्यानाला मोठा प्रतिसाद दिला.
आज मंगळवार दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी फैजपुर येथील बस स्टॅन्ड समोरील शुभ दिव्य लॉन मध्ये रक्षाबंधन निमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामी सोपान कानेरकर यांचे प्रेरणादायी प्रवचन तथा व्याख्यानात महिलांच्या सन्मानाचे आणि समाजात त्यांचे असलेले महत्त्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले.या प्रसंगी डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी महिलांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढील पाऊल उचलण्याचे वचन दिले.समाजात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असून,त्यांच्या सन्मानासाठी आणि विकासासाठी विविध योजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.कार्यक्रमात
मतदारसंघातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे,हिरालाल भाऊ चौधरी,सौ.रंजनाताई पाटील,
सौ.सविताताई भालेराव,हर्षल पाटील,प्रल्हाद महाजन,
उमेश फेगडे,विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपूत,नरेंद्र नारखडे,सौ.सारिका चव्हाण,सौ.रेखा बोंडे,सौ.जयश्री चौधरी,वासुदेव नरवाडे,योगेश चौधरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा