यावल दि.१९
यावल तालुक्यातील सावखेडा परिसरात भोनक नदीवर असलेल्या निंबादेवी धरणाच्या सांडव्याच्या पाण्यात बुडून तालुक्यातील निमगाव टेंभी येथील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने तसेच पोलीस बंदोबस्त असताना घटनास्थळी
/ निंबादेवी धरणावर सुसाट वेगाने वाहने चालवत मुले,मुली,स्त्री-पुरुष कशी काय जातात..? याबाबत आणि घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत यावल तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील निमगाव - टेंभी येथील वेदांत सूर्यवंशी वय २० नावाचा मुलगा आज दुपारी निंबादेवी धरणावर सांडव्याच्या पाण्यात गेला असता अचानक पाण्यात बुडून त्याच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा श्वास गुदमरला त्याला तात्काळ किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारासाठी दाखल केले तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले ही दुर्दैवी घटना आज सोमवार दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी घडली.
निंबादेवी धरणावर काही वर्षांपूर्वी अशाच घटना घडलेल्या आहेत त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो.निंबादेवी धरणावर सांडव्याच्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून अनेक तरुण मुले मुली, स्त्री- पुरुष मिळेल त्या वाहनाने येत असतात मोटरसायकल चालक तर सुसाट वेगाने धावतात. पोलीस बंदोबस्त असल्यावर त्या ठिकाणी फोटोसेशन, करण्यासाठी किंवा सांडव्याच्या पाण्यात आनंद लुटण्यासाठी येणारे येतात कसे..? व्हाट्सअप ग्रुप वर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल होतात कशी..? सांडव्याच्या पाण्यात जाणारे पोलिसांची नजर चुकवून जातात की पोलिसांना विश्वासात घेऊन जातात..? किंवा त्या ठिकाणी पोलीस प्रत्यक्षात हजर राहत नाहीत का..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याकडे डिवायएसपी फैजपूर भाग,यावल तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी आपले लक्ष केंद्रित करून बंदोबस्तात गेलेले पोलीस प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर राहतात किंवा नाही..? याबाबत कार्यवाही करावी आणि हजर राहत असल्यास मुले, मुली त्या ठिकाणी पोहोचतात कशी..? याची सुद्धा चौकशी करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा