यावल दि.१७
१५ ऑगस्ट भावेश या लहान बालकाचा वाढदिवस स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधत त्याच्या वडिलांनी उपदेश साई भक्तीचा म्हणजे साईबाबांनी जसे आपल्या भक्तांना खिचडी खाऊ घातली होती त्याप्रमाणेच गोरगरीब आदिवासी मुलांना खिचडी खाऊ घालून आपल्या लहान मुलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावल शहरातील सर्वसामान्य स्तरातील व्यावसायिक म्हणून केटर असलेले महेश महाजन यांनी उपदेश साई भक्तीचा साईबाबांनी जसे भक्तांना खिचडी खाऊ घातली होती,गोरगरिबांना अन्नदान केले ते विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन मुलाचा वाढदिवस यावल परिसरातील आदिवासी व अत्यंत गोरगरीब मुलांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना खिचडी खाऊ घालून मोठ्या आनंदाने साजरा केला. यावेळी महेश भगवान महाजन यांच्या सोबत सोनू गजानन महाजन,पप्पू भाऊ पवार,चंदू भाऊ बडगुजर,दीपक भाऊ वाघ,दिलीप सोनार तसेच लहान मुलाचा वाढदिवस साजरा करताना त्याच्या छोट्या मित्र परिवारातील सदस्य वेदांत,आयुष,
पराग,सिद्धार्थ इत्यादी उपस्थित होते. लहान मुलाचा वाढदिवस गोरगरीब खऱ्या गरजू मुलांमध्ये साजरा केल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा