सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इंडियन आर्मी टँकमॅन अमोल तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

यावल दि. १५ 
येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन इंडियन आर्मी मधील टँकमॅन अमोल तायडे, डॉ.इसरार खान,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन,संचालक शशिकांत फेगडे,मुद्रांक विक्रेते गोपाळ महाजन,सुरज जाधव इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करून ध्वजारोहण करण्यात आले. 
         सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल मधे नेहमी शैक्षणिक गुणवत्ता,शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रिडा इत्यादी कार्यक्रमांना प्राधान्य देऊन यशस्वीरित्या कार्यक्रम घेतले जातात त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीत म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या विविध घोषणा जयघोष करण्यात आला त्यानंतर प्रमुख उपस्थित मान्यवरांचे स्वागत, सत्कार संस्थेचे संचालक शशिकांत फेगडे, मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम, प्रशांत फेगडे सर यांनी केले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना इंडियन आर्मीचे अमोल तायडे यांनी व शशिकांत फेगडे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्गदर्शन पर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुंदा नारखेडे मॅडम यांनी केले व जागृती चौधरी मॅडम यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पाडण्यासाठी,यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारीवृदानी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात