यावल न.पा.ने लाखो रुपये खर्च करून उभारलेले एक्सप्रेस फिडर विद्युत वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे वारंवार नादुरुस्त.. होते, तो दोष दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन.. ! माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा इशारा.


                            
यावल दि.१४ 
यावल नगरपालिका तर्फे शहराला होणारा पाणपुरवठा नियमित झाला पाहिजे हे धोरण ठेवून जलशुद्धीकरण केंद्र व साठवण तलाव या दोन्ही ठिकाणी कायम स्वरूपात वीज उपलब्ध व्हावी म्हणून यावल येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या संकल्पनेतून एक्सप्रेस फिडरचे काम केले होते.यावल शहरात नळ धराकांना नियमित पाणीपुरवठा व्हायला हवा या उद्देशाने सदर काम करण्यात आले होते. परंतु एक्सप्रेस फिडर वारंवार नादुरुस्त होत असते त्यात काय जो दोष असेल तो तात्काळ दुरुस्त न केल्यास माजी नगराध्यक्ष अतुल पाटील आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की यावल नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून शहराला २ दिवासाड का असेना परंतु साठवण तलाव व जलशुद्धीकरण केंद्र यावरील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नव्हता ही बाब लक्षात घेऊन अतूल पाटील यांनी पाठपुरावा करून एक्सप्रेस फिडरचे काम मंजुर करून घेतले होते. मात्र असे असूनही विद्दुत्त वितरण कंपनी यांचे नाकर्तेपनामुळे दोष निर्माण झाला आहे.विद्युत् वितरण कंपनी यांनी इन्कमर मध्ये यावल न पा व अन्य तीन ठिकाणी एक्सप्रेस फिडर चे विज जोडणी केली असल्याने कनेक्शन खंडीत होत आहे. वास्तविक पाहता यावल नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून एक्सप्रेस फिडर उभारलेले आहे. विद्युत् वितरण कंपनीचे आम्ही ग्राहक असून त्यांनी सदर इन्केमर ची सेटिंग करून दोष दुरुस्ती केली पाहिजे.विद्दुत वितरण कंपनी यावल येथील अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार सांगून देखील दोष दुरुस्ती करण्यात आलेली नाही.ती तत्काळ दुरुस्त कऱण्यात यावी व शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी विद्युत् वितरण कंपनी कडे लेखी स्वरूपात केली आहे. सदर कामं १० दिवसाच्या आत न केल्यास आपल्या कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात