यावल दि.१३
नगरपालिका हद्दीत मुख्य रस्ते गल्लीबोळातील रस्ते यांच्यासह विकसित भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे ठीक- ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक,वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तसेच यावल नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याची मागणी यावल शहर भाजपा उपाध्यक्ष मुकेश कोळी,भाजपा युवा मोर्चा माजी शहर सरचिटणीस भरत धनगर यांनी यावल नगरपरिषदेकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
यावल शहरात विविध समस्या आहेत सुंदरनगर,आसारामनगर,स्वामी नारायण मंदिरा मागे जोडणारे रस्त्यांवरील खड्डे बुजविणे बाबत तसेच गटारी दुरुस्त कराव्यात तसेच यावल नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी तसेच नगरपरिषद बांधकाम अभियंता नियुक्ती नसल्याने शहरातील अनेक समस्या प्रलंबित झाल्या आहेत.मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील आणि विकसित भागातील रस्त्यांची अक्षरशा चाळणी होऊन खड्डे पडलेले आहेत पर्यायी रस्त्याने पायदळ चालणाऱ्यांना व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे मुख्य रस्त्यावर आडव्या खोलगट चाऱ्या पडल्या आहेत.अनेक ठिकाणी बेकायदा अनधिकृत गतिरोधक निर्माण झाले आहेत याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.ही कामे केली गेली पाहिजे याबाबतचे निवेदन भाजप यावल शहर उपाध्यक्ष मुकेश रमेश कोळी व भाजपा युवा मोर्चा माजी शहर सरचिटणीस भरत धनगर यावल यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांच्याकडे दिले.यावल नगरपरिषद याबाबत काय कारवाई करणार आणि कारवाई न केल्यास भारतीय जनता पक्ष पुढील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष देणे आहे.
सर्वसामान्य पदाधिकारी कार्यकर्त्यांना समस्यांची जाणीव आहे परंतु सर्व राजकीय पक्षातील काही ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि चमकोगिरी करणारे काही संघटनांमधील समाजसेवक नगरपालिके विषयी स्पष्ट भूमिका घेत नसल्याने आणि समन्वयाचे राजकारण करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा