किनगाव बु. ग्रा.पं. १५ वा वित्त आयोग निधीचा झाला खर्च परंतु खरेदी केलेल्या वस्तू गेल्या कुठे..? जि.प. व यावल पं.स.कडे ग्रा.पं.सदस्यांची लेखी तक्रार. ग्रामविकास अधिकाऱ्यांसह दप्तर तपासणी करणारा अधिकारी होणार निलंबित.


यावल दि.१२
तालुक्यातील किनगाव बुद्रुक ग्रामविकास अधिकाऱ्यांने १५ वा वित्त आयोग निधी खर्च केला परंतु खर्च केलेल्या निधीतून खरेदी केलेल्या अंदाजे १० लाख रुपयांच्या वस्तू प्रत्यक्ष ठिकाणी नसल्याने वस्तू कुठे आणि कोणाच्या सहकार्याने कुठे गेल्या..? आणि या संदर्भातील विषय नवनियुक्त सरपंच उपसरपंच व सदस्यांनी नामंजूर केल्याबाबतची लेखी तक्रार ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सदस्यांनी आज सोमवार दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे केल्याने यावल तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
      यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी,आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या संपूर्ण योजनांची निधीची आणि प्रत्यक्ष कामांची खात्री चौकशी करून कार्यवाही केल्यास फार मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात