यावल दि.११
यावल शहरात मेन रोडवर आणि गल्लीबोळात,सर्वत्र ठिकाणी मोकाट गुरांनी बेमुदत आंदोलन आणि भटकंती सुरू ठेवली असून त्यांच्याकडे बेशरम नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने मोकाट गुरांनी आपल्या न्यायनिवाडासाठी चक्क पोलीस स्टेशनचा मार्ग निवडल्याने नागरिकांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि यावल शहरात मोकाट गुरांनी भर रस्त्यावर बेशरम असलेल्या नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात गेल्या महिन्या- दीड महिन्यापासून बेमुदत आंदोलन सुरू करून ठिकठिकाणी आपला आंदोलनाचा ठिय्या मांडला आहे.तरी सुद्धा नगरपालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात दीड महिन्यात कोणतीही दखल न घेतल्याने आणि काही राजकारणी, लोकप्रतिनिधी सलोख्याचे हितसंबंध निभावत ( निर्णय घेतल्यास मतदानावर आणि संबंधितांच्या आर्थिक हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो म्हणून ) याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये व सर्व प्रकारच्या वाहनधारकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर दिवसभर, रात्रभर गुरे मोकळे सोडून देणारे त्यांचे मालक कोण आहेत..? किंवा मोकळ्या गुरांचे कोणी मालक नसतील तर नगरपालिका प्रशासन या मोकळ्या गुरांना पकडून पुढील कारवाई का करीत नाही..? आणि मोकाट गुरांची धरपकड करून कारवाई होत नसल्याने यावल शहरात मुख्य रस्त्यावर आणि बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच गल्लीबोळात सर्व स्तरातील रहदारीस वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे यामुळे अनेक वेळा ट्राफिक जाम होऊन एखाद्या वेळेस अप्रिय घटना घडण्याची सुद्धा दाट शक्यता निर्माण झाली आहे तरी यावल पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलेल्या मोकाट गुरांची दखल किमान यावल पोलिसांनी घेऊन त्याबाबतचा पत्रव्यवहार नगरपालिकेकडे करून त्यांचे काय म्हणणे आहे त्यांच्याकडून तात्काळ खुलासा मागवून घ्यावा आणि खुलासा न आल्यास सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून यावल पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन यावल नगर परिषदेवर दंडात्मक स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा