यावल दि.१६ तालुक्यातील किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत भाजपाच्या सरपंच निर्मला संजय पाटील यांनी राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांचे आप-आपसात ठरल्याप्रमाणे आता दि.२४ जुलै २०२४ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला सरपंच म्हणून सौ.भारती प्रशांत पाटील यांची सभासदांच्या बैठकीत एकमताने निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
महसूल कडून मिळालेल्या माहितीनुसार किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पद हे नामाप्र महिला म्हणून राखीव आहे माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली किनगाव ग्रामपंचायतचा कारभार सुरू होता आणि राहील त्यानुसार ग्रामपंचायत सदस्यांनी आप-आपसात ठरवून दोन वर्षासाठी निर्मला संजय पाटील यांची सरपंच पदी निवड केली होती.परंतु सरपंच सौ.निर्मला संजय पाटील यांनी अंदाजे १४ महिने आपल्या पदाचा राजीनामा उशिरा दिला. याबाबत किनगाव ग्रामस्थांसह काही सदस्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते परंतु आता या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला असून बुधवार दि. २४ जुलै २०२४ म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सौ. भारती प्रशांत पाटील यांची ठरल्याप्रमाणे एकमताने निवड होणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे किनगाव ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.
किनगाव बुद्रुक सरपंच यांचे निवडीसाठी ग्रामपंचायतीच्या सभासदांची सभा घेण्याची दि.१६ जुलै २०२४ ची ग्रामपंचायत सदस्यांना दिलेली नोटीस प्रत्यक्ष बघितली असता स्वाक्षरी करणार म्हणून अध्यासी अधिकारी सरपंच निवडणूक ग्रामपंचायत किनगाव बुद्रुक असे नोटीसवर स्पष्टपणे नमूद आहे. स्वाक्षरी करणार नेमका कोण अधिकारी आहे आणि त्याचे पद काय..? आणि किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत मधील कोणता पदाधिकारी आहे का..? किंवा पंचायत समिती मधील कोण पदाधिकारी आहे..? तसेच स्वाक्षरी करणार महसूल मधील अधिकारी आहे किंवा कसे याबाबत त्यांच्या पदाचा उल्लेख नोटीस वर नसल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा