यावल दि.८
बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेत इयत्ता पहिली ते सातवी तील एकूण ४९५ विद्यार्थ्यांची यावल येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
यावल वैद्यकीय अधिकारी डॉ.अमीन तडवी,डॉ.परवीन तडवी तसेच औषध निर्माता विनोद बोदडे यांचे कडून तपासणी करून विद्यार्थ्यांना योग्य तो औषधोपचार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला.वैद्यकीय तपासणी शनिवार दि. ६ व सोमवार दि. ८ जुलै २०२४ या दोन दिवसात करण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर, शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा