यावल दि.१६
राज्य सरकारने 'लाडकी बहीण' योजना मोठा गाजावाजा आणि प्रसिद्धी करून सुरू केली, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व स्तरातील महिला मोठी भटकंती करीत आहे याबरोबर शासकीय यंत्रणा सुद्धा मोठ्या जोमाने कामाला लागली आहे.या योजनेच्या कामकाजासाठी संबंधित सर्व यंत्रणा लाभार्थी महिला आपले दैनंदिन काम धंदे सोडून कामाला लागली मात्र वीज वितरण कंपनी कोणतीही सूचना न देता आणि कोणतही वादळ वारा पाऊस नसताना अचानक अर्धा तास एक तास वीजपुरवठा अनियमित वेळेवर खंडित करून टाकत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिण योजनेला खरा अडथळा वीज वितरण कंपनीचा असल्याचे आता राजकारणात समाजात बोलले जात आहे.
उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होतो त्यापेक्षा जास्त वीज पुरवठा आता लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून दिवसा व संध्याकाळी केव्हा पण अवेळी सतत खंडित होत आहे यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र दाखल्यांची जुळवाजुळव आणि झेरॉक्स प्रति काढण्यासाठी महिलांची चांगली तारांबळ उडत आहे,वीज वितरण कंपनी जाणून बुजून राज्य सरकार बदनाम होईल म्हणून वीजपुरवठा खंडित करीत आहे का.. असा सुद्धा आरोपाचा सर्व स्तरातून लावला जात आहे तरी लोकप्रतिनिधींनी याकडे आपले लक्ष केंद्रित करून वीज मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन दिवसा संध्याकाळी व रात्री अवेळी केव्हाही खंडित होणारा वीज पुरवठा पूर्ववत नियमित वेळेवर सुरू राहण्याबाबत आणि वीज पुरवठा खंडित करायचा असल्यास नागरिकांना तशा सूचना द्यायला पाहिजे असे नागरिक शेतकरी व महिला वर्गात बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा