आदिवासीं शिवाय जंगल नाही व जंगला वाचून आदिवासी बांधव नाही : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.

दि.७ आदिवासीं शिवाय जंगल नाही व जंगला वाचून आदिवासी नाही ही संकल्पना मांडून त्यांचे व जंगलाचे महत्व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.त्यांनी यावल येथे यावल वन विभागाच्या आयोजित कार्यक्रमात उपस्थित आदिवासी बांधव,वन कर्मचारी अधिकारी व कर्मचारी बांधवांना मार्गदर्शन केले.
        यावल वनविभाग उपवनसंरक्षक यांच्या संकल्पनेतून आदिवासी बांधवाचे वनातील गौण वनउपजापासून शाश्वत रोजगार मिळावा याकरीता यावल वन विभाग जळगांव सतत प्रयत्नशील आहेत आणि याच हेतूने उमेद स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशन जळगांव यांच्या संयुक्त विदयमानाने यावल पूर्व वनक्षेत्रात वन महोत्सव सप्ताहा निमीत्त आदिवासी बांधव,ग्रामस्थ व शेतकरी तसेच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना ५ दिवसीय लाख,मध,डिंक, बांबू व मोहा या गौण वनोपजाचे उत्पादन,व्यवस्थापन आणि कौशल्य वाढवण्याचे प्रशिक्षण फाऊडेशनचे अध्यक्ष विरेंद्र छाजेड व त्यांच्या चमू कडून नुकतेच देण्यात आले.
        प्रशिक्षणार्थी आदिवासी ग्रामस्थ, शेतकरी,बचत गट सदस्य संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन कर्मचारी यांना  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जळगाव येथील यावल उपवन संरक्षक जमीर शेख, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार,तहसिलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यावल यांचे हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र देवून सविस्तर अमोल असे मार्गदर्शन करण्यात आले.त्यात  जिल्हाधिकारी जळगांव यांनी आदिवासीं शिवाय जंगल नाही व जंगला वाचून आदिवासी नाही ही संकलपना उदघोषीत करुन त्याचे महत्व समजाऊन सांगितले. तसेच आदिवासी बांधव व शेतकरी यांच्या विकासाला वन व वन विभाग कसा पुरक आहे.तसेच वने व मनुष्य जिवन यांचा ताळमेळ बसवून जिवनमान कसे उंचावेल या बाबत मार्गदर्शन केले.वनांपासून मिळणारे गौणवनोपज मनुष्य जिवनात किती महत्वाचे आहेत आणि कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी उत्पन्नांचा महत्वाचा स्त्रोत आहे याची जाणीव करुन दिली म्हणूनच जंगल वाचविणे ही फक्त वन विभागाची नव्हे तर आपल्या सर्वांची नैतीक जबाबदारी आहे. याकडे लक्ष वेधले.तसेच आदिवासींच्या विकासाठी सर्व यंत्रणाच्या समन्वयासह यावल वन विभाग कटीबध्द राहिल अशी ग्वाही जळगाव येथील यावल वन विभाग उपवनसंरक्षक जमिर शेख यांनी दिली.
  वन महोत्सवा निमीत्तच् एक पेड मॉ के नाम या संकल्पनेतून मोफत वृक्ष वाटप केले.तसेच जिल्हाधिकारी जळगांव यांनी डोंगरदे येथे आश्रम शाळेत वृक्ष रोपणाचा कार्यक्रम केला.तसेच मनवेल येथील आदिवासी आश्रम शाळेत देखील वृक्षारोपण करण्यात आले.सदर कार्यक्रमात आदिवासी ग्रामस्थ तसेच यावल उपवनसंरक्षक जमीर शेख तसेच यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे, यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे, रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण,निर्मुलन यावल तसेच वन कर्मचारी यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात