यावल दि.१६
राज्य सरकारने 'लाडकी बहीण' योजना सुरू केल्याने योजनेचा लाभ सर्व स्तरातील महिलांना मिळण्यासाठी व फॉर्म भरण्यासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली जात आहे. व काही ठिकाणी आर्थिक निवडणूक होत असल्याने आपल्या प्रभागातील महिलांची कागदपत्रे,दाखले जुळवा-जुळव करण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून तसेच अवाजवी खर्च वाचावा म्हणून फॉर्म भरून देण्यासाठी यावल शहरातील माजी नगरसेविका सौ.कल्पना दिलीप वाणी यांच्या कुटुंबीयांतर्फे मोफत सुविधा मार्गदर्शन उपलब्ध करण्यात आली आहे.
ही सुविधा फक्त यावल नगरपरिषद प्रभाग क्र. ७ मधील महिलांसाठी माजी नगरसेविका सौ.कल्पना दिलीप वाणी,त्यांचे पती दिलीप वाणी,पूजा श्रावगी,राजेश रावजी यांनी मोफत उपलब्ध करून दिली आहे,यात प्रामुख्याने 'लाडकी बहिणी' योजनेसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड,लिविंग सर्टिफिकेट,बँक पुस्तकाची छायांकित प्रत,हमी पत्र लागतात याच्या उपलब्धतेसाठी मार्गदर्शन करून फॉर्म मोफत भरून दिले जात असल्याने प्रभाग क्रमांक सात लाडक्या बहिणींची भटकंती होत नसल्याने आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळून योजनेचा लाभ मिळणार असल्याने माजी नगरसेविका कल्पना वाणी यांच्या कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा