यावल दि.१४
भुसावळ, यावल आणि जळगाव तालुक्याच्या सीमा रेषेला लागून तापी नदीच्या परिसरातून भूगर्भातून दररोज शेकडो ब्रास डबर व मुरूम उत्खनन करून आणि पिवळ्या मातीच्या उंच टेकड्याचे सपाटीकरण करून गौण खनिजाची सर्रासपणे बेकायदा लूट,वाहतूक सुरू आहे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, शासकीय जागांवर नाल्यांवर बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमण होत आहे मात्र यात संबंधित सर्कल,तलाठी यांच्या कामकाजाबाबत संशय व्यक्त केला जात आहे जनमानसातून तोंडी,लेखी तक्रारी वाढल्याने आता यावल तहसीलदार स्वतः घटनास्थळी भेटी देऊन दंडात्मक कारवाई करणार आहेत.
गेल्या २ ते ३ महिन्यात वरील तीनही तालुक्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार हे लोकसभा निवडणुकीसह आपल्या कार्यालयीन दैनंदिन शासकीय कामात वाजवीपेक्षा जास्त व्यस्त असल्याने गौण खनिज उत्खनन करून वाहतूक व व्यवसाय करणाऱ्यांना एक सुवर्णसंधी प्राप्त झाली होती,या सुवर्णसंधीचा फायदा घेत राजकीय व सामाजिक प्रभावाचा वापर करून यावल भुसावळ रोडवरील अंजाळे शिवारात, यावल शहराजवळील उंच टेकड्यांचे सपाटीकरण करून हजारो ब्रास पिवळी माती वाहतूक यावल भुसावळ, भुसावळ फैजपुर,शेळगाव परिसरातून बोरावल मार्गे यावल रोडवरून इतर अनेक ठीक ठिकाणी करण्यात आली ही पिवळी माती वाहतूक करतानाचे परवाने शेतकऱ्यांच्या नावाखाली तसेच गाळ वाहतुकीच्या नावाखाली मिळवून घेतले असले तरी याबाबत मात्र संबंधित सर्कल आणि तलाठी यांनी प्रत्यक्ष खात्री चौकशी न करता वेळेवर आणि सोयीनुसार तहसीलदारांची दिशाभूल केल्याचे आता खुद्द गौण खनिज वाहतूकदारांमध्येच बोलले जात आहे तसेच यावल शहरात विकसित परिसरात बिनशेती परवानगी मिळाल्यानंतर उंच टेकड्यांचे सपाटीकरण झाले आणि सुरू आहे,आणि काही ठिकाणचे सपाटीकरण अजून करणार आहेत आणि त्यासोबत शासकीय जागांवर,नाल्यानवर बेकायदा बांधकाम अतिक्रमण झाले आहे आणि सुरू आहे याबाबत अनेकांच्या तक्रारी सुद्धा आहेत यात सुद्धा सर्कल तलाठी यांनी संबंधित जागांचे विकासकांच्या सोयीनुसार पंचनामे करून तहसीलदारांकडे अहवाल दिले, नगरपालिका बेकायदा कामांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने ते सुद्धा संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. तापी नदी किनारपट्टीत काही स्टोन क्रशर चालक-मालक यांनी श्री गणेशाच्या साक्षीने गौण खनिज उत्खननाची नाममात्र रॉयल्टी भरून परवाने काढून हजारो ब्रास डबर,व मुरूम उत्खनन करून कोट्यावधी रुपयाची कमाई केली आणि पुढे सुद्धा करणार आहेत गौण खनिज उत्खनन,उंच टेकड्या सपाटीकरण,शासकीय जागांवर,नाल्यावर अतिक्रमणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे लक्षात आल्याने यावल तहसीलदार आता प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी देऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
कारवाईचे खापर प्रसिद्धी माध्यमांच्या डोक्यावर फोडले जाते...?
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक प्रकरणात काही ठराविक स्टोन क्रशर चालक-मालक यांच्यावर महसूल मार्फत कारवाई केली जाते यात तर काहींच्या अवैध गौण खनिज वाहन धारकावर कधीच कारवाई झालेली नाही,यात काही ठराविक राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते सुद्धा आपल्या पक्षश्रेष्ठींच्या राजकीय प्रभावाचा आणि पदाचा गैरवापर करून अवैध गौण खनिज वाहतूक करतात असे असताना ठरल्याप्रमाणे जे मासिक हप्ता देत नाही त्यांचे अवैध गौण खनिज वाहन पकडल्यानंतर वृत्तपत्रात बातमी आली म्हणून कारवाई करावी लागते असे काही तलाठी,सर्कल अवैध धंदेवाल्यांना सांगून आपल्या कारवाईचे खापर प्रसिद्धी माध्यमांच्या डोक्यावर फोडतात ही वस्तुस्थिती निर्माण आहे.भुसावळ विभागातील महसूल,आरटीओ,पोलीस यांनी संयुक्तिकरित्या अवैध गौण खनिज वाहन क्रमांकसह चालक,मालक यांची यादी तयार करून दप्तरी नोंद करून ठेवावी अशी रास्त अपेक्षा सर्व स्तरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा