यावल दि.१३
यावल तालुक्याच्या सीमेवर तसेच जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेजवर ५९२ कोटी रुपयाच्या उपसा सिंचन योजनेस यावल ( उद्धव शेळगाव बँरेज ) महाराष्ट्र शासन मध्यम प्रकल्प कार्यासन अवर सचिव राजेश काळे यांनी काल शुक्रवार दि.१२जुलै २०२४ रोजी तत्वतः मान्यता देऊन त्याबाबतचे लेखी पत्र तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यकारी संचालक यांना दिले.
हा प्रकल्प माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या राजकीय कार्य काळातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प होता आणि त्यांचे फार मोठे राजकीय व सर्वसामाजिक हिताचे मोठे स्वप्न होते. यासाठी त्यांनी शासन स्तरावर वेळोवेळी त्यावेळी प्रयत्न केले होते आणि आहेत आणि आता त्यानंतर या प्रकल्पासाठी मंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, गिरीश महाजन,गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाखाली चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ.लताताई सोनवणे,माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे,
जळगाव जिल्हा पूर्व भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे भावी उमेदवार अमोलदादा जावळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने सदरची प्रस्तावित उपसा सिंचन योजना यावल ( उद्धव शेळगाव बँरेज ) तत्वतः मान्यता देण्यात आली.
या उपसा सिंचन योजनेमुळे रावेर व चोपडा विधानसभा मतदारसंघातील एकूण ९ हजार १८२ हेक्टर शेतजमिन ओलिताखाली येणार असल्याने या योजनेचा शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पादनासाठी मोठा फायदा होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा