यावल येशील जे टी महाजन इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे आषाढी एकादशी निमित्त यावल शहरात भव्य दिंडी काढण्यात आली.

यावल दि.१६ 
येथील जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आषाढी एकादशी निमित्त स्कूल पासून यावल शहरात भव्यदिंडी काढण्यात आली.
   उद्या बुधवार दि.२७ रोजी आषाढी एकादशी निमित्त जिल्ह्यातील सर्व शाळांना शासकीय सुटी असल्याने यावल येथील जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आज मंगळवार दि.१६ रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे.आयोजन करण्यात आले होते यात इ.५ वी ते १० वीतील विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.त्यामध्ये 
विदयार्थ्यांनी जनाबाई,मुक्ताबाई विठ्ठल,रुखमणी,मुक्ताबाई,
मीराबाई, ज्ञानेश्वर,तुकाराम,सोपान इ. संतांच्या वेशभूषा साकारल्या शाळेच्या प्राचार्या रंजन महाजन मॅडम व प्राचार्य  ज्ञानेश्वर मावळे सर यांच्या हस्ते पालखीचे पुजन करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.दिंडी शाळेच्या परिसरातून गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली.विदयार्थ्यांनी लेझिम,टाळ,फुगडी पावली खेळून गावातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतल्याने दिंडी सोहळा आनंददायी उत्साही वातावरणात पार पडला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात