गरीबदासचा मुलगा लेखापाल किरण अहिरे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. धुळे वनवृत्त विभागात मोठी खळबळ.

यावल दि.११
धुळे येथील उपवनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल तथा गरीबदास यांचा मुलगा किरण गरीबदास अहिरे यांनी चाळीसगाव तालुक्यातील लाकूड व्यवसाय करणाऱ्यास लाकूड वाहतूक परवानगी देणे कामी तीन हजार रुपयाची लाच मागून ती लाच स्वीकारताना धुळे येथील लास्ट लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने आज गुरुवार दि.११ जुलै २०२४ रोजी रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला.
         याबाबत सविस्तर माहिती अशी की
आरोपी किरण गरीबदास अहिरे, लेखापाल, उप वनसंरक्षक कार्यालय,धुळे वन विभाग,धुळे यांनी तक्रारदार यांचेकडुन ३,००० /- रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
            तक्रारदार हे बहाळ ( रथाचे), ता. चाळीसगांव, जि.जळगांव येथील रहिवाशी असुन त्यांचा लाकुड वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी मौजे गरताड ता. व जि. धुळे येथील शेतकरी यांच्या शेतात लागवड केलेल्या तोडलेल्या सागाच्या १०० झाडांच्या लाकडाच्या ९७ नगाची वाहतुक करण्याचे काम घेतले होते. त्याकरीता सदर गरताड येथील शेतक-याने झाडे तोडुन लाकुड वाहतुकीची परवानगी मिळणेकरीता दि.२१.०२.२०२४ व २३.०२.२०२४ रोजी वन क्षेत्रपाल, धुळे ( ग्रामीण ) यांचेकडे अर्ज
केलेला होता. सदरची परवानगी मिळणेकरीता तकारदार हे उप वनसंरक्षक कार्यालय, धुळे येथे जावुन पाठपुरावा करीत होते.तेव्हा सदर कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकुड वाहतुकीच्या परवानगीचे काम करुन देणेसाठी तक्रारदार यांचेकडे ३,०००/- रु. लाचेची मागणी केल्याची दि.१०.०७. २०२४ रोजी तक्रारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयाकडे दिली होती.सदर तक्रारीची आज दि.११.०७ २०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान लेखापाल किरण अहिरे यांनी तक्रारदार यांचेकडे ३,०००/- रु लाचेची मागणी करुन ३,००० /- रुपये स्विकारण्याचे मान्य केल्याने आज रोजी त्यांचेवर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पो.स्टे.जि.धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम,संतोष पावरा, 
मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, प्रशांत बागुल व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.सदर 
कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत यांचे मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात