यावल दि.२
मंगळवार दि. २ जुलै २०२४ रोजी यावल शहरातील भाजपाच्या सर्व बूथ प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक यावल येथे खरेदी विक्री संघात घेण्यात आली बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन तसेच यावल शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात शहराध्यक्ष राहुल बारी,कार्याध्यक्ष किशोर कुलकर्णी, तर महिला अध्यक्षपदी सौ.नंदा महाजन यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीस नवमतदार नोंदणी आणि माझी लाडकी बहीण योजना प्रभावी पणे राबविण्यासाठी तसेच प्रयत्न करण्यासाठी डॉ.कुंदन फेगडे,
पी.एस.सोनवणे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.बैठकीत राकेश फेगडे,शहर अध्यक्ष राहुल बारी,तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, हेमराज फेगडे ,गोविंदा बारी,भूषण फेगडे योगेश चौधरी,रितेश बारी,सागर चौधरी,डॉ.अभय रावते,सिद्धांत घारु,
आकाश कोळी,कोमल इंगळे,मुकेश कोळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत भारतीय जनता पार्टी यावल शहर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.ती पुढील प्रमाणे भारतीय जनता पार्टी यावल शहर कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून राहुल पंढरीनाथ बारी,कार्याध्यक्ष- किशोर भिकाजी कुलकर्णी,उपाध्यक्ष म्हणून संजय वसंत फिरके,मुकेश रमेश कोळी, सुनील काशिनाथ बडगुजर,योगेश वासुदेव वाणी,सिद्धांत राजू घारू,सरचिटणीस म्हणून योगेश विजय चौधरी,गोविंद मधुकर बारी,तर चिटणीस म्हणून छोटू माधव कुंभार,दगडू गणू भिल, रवींद्र सुपडू भालेराव ललित वसंत परमार्थ जालंधर वासुदेव कोळी, युवा मोर्चा यावल शहर अध्यक्ष म्हणून विशाल बाळासाहेब शिर्के, तसेच महिला आघाडी अध्यक्ष सौ.नंदा राजेंद्र महाजन यांची सर्वांनुमाते निवड करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत अभिनंदन सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा