यावल दि.२१
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्र्वर भोई व प्रकल्प संचालक राजू सुकदेव लोखंडे यांनी त्यांच्या भागीदारीतील चारचाकी वाहन जिल्हा कक्षात भाडे तत्वावर घेवून मुख्यकार्यकारीअधिकारी
यांची दिशाभूल केल्याबद्दल व आर्थिक अफरातफर केल्याबद्दलची लेखी तक्रार संबंधित मंत्री महोदय यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दि.१९ जून २०२४ रोजी जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ता तथा समाजसेवक दिनेश कडू भोळे यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.गिरीष महाजन,
सीबीडी बेलापूर,नवी मुंबई. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक परीक्षेत्र,नाशिक , जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे
पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षात करार तत्वावर कार्यरत असलेले जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्र्वर मुरलीधर भोई व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू सुकदेव लोखंडे हे गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जळगाव अंतर्गत विविध मार्गांनी शासकीय निधीची अफरातफर करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी जिल्हा कक्षाला विविध बाबींची माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागणी केली आहे. यांत अनेक धक्कादायक माहिती समोर आली असून हरेश्र्वर भोई यांनी त्यांचा धाकटा भाऊ नामे पंकज मुरलीधर भोई यांच्या मालकीचे चारचाकी वाहन ( MH 19 EA 6527 ) जिल्हा कक्षाच्या कामकाजासाठी प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांच्या शिफारशीनुसार त्रयस्थ संस्थेकडून भाड्याने घेण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांची दिशाभूल करुन मंजून करून घेतला.सदरील बोलेरो टी यू व्ही वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र,करार बंधपत्र इ कागदपत्रे आवश्यक असतांना यापैकी काहीही उपलब्ध नसल्याचे जिल्हा व्यवस्थापक लोकेश जोशी यांनी सांगितले आहे.तसेच दि. १८ जानेवारी २०२३ रोजी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत हे रजेवर असतांना त्यांचा पदभार राजू लोखंडे प्रकल्प संचालक यांचे कडे सोपविण्यात आला असता याकाळात राजू लोखंडे यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या वाहनाच्या मुदतवाढ प्रस्तावाला मंजूरी घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार चुकीच्या पद्धतीने सदरील वाहनाचे लाॅग बुक भरण्यात आले असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत नेमणूकीस असलेल्या वाहनचालकाने अंदाजे हे लाॅगबुक भरले असल्याचे समजले आहे.जिल्हा कक्षात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता देय असूनही त्यांची या बोलेरो वाहनाने फिरस्ती दाखवून लाखो रुपयांची देयके उकळण्यात आली आहेत. प्रत्यक्षात लोखंडे आपल्या घरी बुलडाणा येथे ये जा करण्यासाठी हे वाहन वापरत असल्याचे समजले आहे. सदरील वाहन प्रकल्प संचालक राजू लोखंडे व जिल्हाअभियान
व्यवस्थापक हरेश्र्वर भोई यांच्या संयुक्त भागीदारी मालकीचे असून ग्रामीण स्वच्छ भारत मिशन जि.प.जळगांव येथे नियुक्तीस असलेल्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या राधेय टुर्स ट्रॅव्हल्स या एजन्सीकडून प्रचलित नियम व धोरणांची अंमलबजावणी न करता भाड्याने घेतले आहे.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागणी केल्यानंतर जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष माहिती देण्यात टाळाटाळ करीत होते.याविषयी दि २८ जानेवारी रोजी प्रकल्प संचालक यांच्या दालनात दुपारी १ वाजता त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता आपण विहीत शुल्क रु २५० मात्र भरून माहिती प्राप्त करावी असे सांगितले असता लोकेश जोशी यांना मी रु ५५० सुपुर्द केले व संबंधित कर्मचाऱ्याने दुपारी तीन वाजता माहिती घेऊन जावे असे सांगितले. यावेळी लोकेश जोशी यांनी शुल्क भरल्याची कोणतीही पावती मला दिली नाही व उरलेले पैसे देखील परत न करता व दुपारी मला देण्यासाठी ची माहिती न देता कर्मचारी हा कर्मचारी घरी जाण्याकरीता धुळे येथे रवाना झाला.तदनंतर माहिती घेण्यासाठी कार्यालयात गेलो असता लोकेश जोशी रवाना झाल्याचे कळाले.जोशी यांच्याशी संपर्क केला असता जोशी यांने संध्याकाळी सहा वाजता पौर्णिमा झेरॉक्स स्टेडियम चौफुली जळगांव येथून माहितीची कागदपत्रे घेवून मला सोपविली म्हणजेच दुपारी ३ वाजता जिल्हा कक्षाकडे मला देण्यासाठी माहिती तयार नव्हती हे सिद्ध होते. सदरील माहिती ही अपूर्ण असून बरीचशी कागदपत्रे गहाळ आहेत.
प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी गेल्या वर्षभरात अंकित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीतीत लोखंडे यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असतांना पदाचा गैरवापर करून अनेक नियमबाह्य नस्त्यां मंजूर केल्या असून लाखो रुपयांची असंपदा या माध्यमातून लोखंडे यांनी कमावली आहे.वरील संदर्भ क्र. १ अन्वये जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय मुक्ताई सरस या महोत्सवाचे ढिसाळ नियोजन,यादरम्यान अनिल बडगुजर या वादग्रस्त कर्मचाऱ्याने पत्रकारांशी केलेले गैरवर्तन,मर्जीतील भोजन ठेकेदाराची निवड,सन २०१६ च्या नशिराबाद येथील ग्रामीण स्वच्छ भारत मिशन च्या शौचालय घोटाळ्यातील अपहारातील संशयित हरेश्र्वर भोई यांस सोपविण्यात आलेला जिल्हा अभियान व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार व प्रदान केलेले विशेष अधिकार याविषयी तसेच संदर्भ क्र. २ अन्वये प्रकल्प संचालक राजू लोखंडे,अतिरिक्त जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्र्वर भोई यांनी संगनमताने केलेल्या भ्रष्टाचारा विषयी संदर्भ २ अन्वये तक्रार दाखल आहे.
प्रकल्प संचालक राजू सुकदेव लोखंडे हे विविध अपहार तसेच फसवणूकीच्या प्रकरणातील संशयित असलेले वादग्रस्त कर्मचारी अनिल हरी बडगुजर तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशन क्षमता बांधणी व संस्था बांधणी व हरेश्र्वर भोई जिल्हा व्यवस्थापक विपणन व ज्ञान या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सामूहिक भ्रष्टाचार व अंकित मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत.
तरी जिल्हा कक्षात नियमबाह्य पद्धतीने भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनाचा करार तात्काळ संपुष्टात आणून राधेय टुर्स ट्रॅव्हल्स या एजन्सीचा समावेश काळ्या यादीत करण्यात यावा. प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांची तात्काळ बदली करून त्यांची शासनस्तरावर चोकशी होवून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्ता व उत्पन्न,असंपदा याबाबत चौकशी करण्यात यावी व हरेश्र्वर भोई जिल्हा व्यवस्थापक विपणन व ज्ञान तसेच जिल्हा कक्षात अनधिकृत ठाण मांडून असलेला अनिल बडगुजर तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशन क्षमता बांधणी व संस्था बांधणी धरणगाव या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी सेवा समाप्त करण्यात याव्यात अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश कडू भोळे यांनी केली असून पुढील कार्यवाही कडे त्यांचे लक्ष वेधून.
टिप्पणी पोस्ट करा