यावल दि.१०
विधान परिषद तारांकित प्रश्न क्रमांक २३७४१ यावल तालुक्यातील फैजपूर नगर परिषदेच्या विविध विकास कामांमधील भ्रष्टाचाराबाबत विषानुसार महाराष्ट्र शासन अवर सचिव जयंतवाणी यांनी दि.२२ मे २०२४ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांना लेखी पत्र देऊन नमूद उपप्रश्न निहाय उत्तर सविस्तर टिपणीसह तात्काळ शासनास सादर करावे असे म्हटले आहे.
दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी सन २०२४ च्या दुसऱ्या(पावसाळी)अधिवेशनात उपस्थित केलेला विधान परिषद तारांकित प्रश्न नुसार
(१) जळगाव जिल्ह्यातील फैजपूर नगरपरिषदेच्या विविध विकास कामांमधील अपहार प्रकरणी दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांच्या पत्रान्वये दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे
आदेश दिले होते,हे खरे आहे काय, (२) असल्यास, सदर आदेशाचे उल्लंघन करून नूतन जिल्हाधिकारी यांनी अधिकार क्षेत्रात नसताना सुनावणी घेवून बनावट दस्तऐवजाचा आधार घेत दोषींना अभय देत बेकायदेशीर संरक्षण दिले,
शासनाची आर्थिक फसवणूक केली,कोणतीही कारवाई केली नाही अशा आशयाची तक्रार दि. ३ एप्रिल २०२४ रोजी वा त्या सुमारास शासनाकडे करण्यात आली आहे,हे ही खरे आहे काय, (३) असल्यास, उक्त तक्रारीच्या अनुषंगाने सन २०२२ मध्ये जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल
करण्याचे निदेश दिले असताना तद्नंतरच्या जिल्हाधिकारी यांनी दोषींना अभय दिल्या प्रकरणी शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली अथवा करण्यात येत आहे?
(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?
उक्त प्रश्नाबाबत उपप्रश्ननिहाय उत्तर,सविस्तर टिप्पणीसह तात्काळ उपरोक्त ई-मेलवर शासनास सादर करावे.तसेच सदर प्रश्नाशी संबंधित अधिकाऱ्यांची नावे मोबाईल क्रमांकासह सादर करावे असे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे यामुळे जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयासह नगरपालिका क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत फैजपुर येथील ललित कुमार चौधरी यांनी १५ मार्च २०२३ रोजी लोकायुक्त यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार केली होती आणि आहे आणि या तक्रारीनुसार विधान परिषदेत सुद्धा तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा