यावल दि.२६ मे
नाशिकमध्ये आयकर विभागाने काही सोन्या-चांदीचे व्यापाऱ्यांवर सलग 30 तास कारवाई केल्याने नाशिक विभागात व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
सोन्या चांदीचा व्यापार करणाऱ्यांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत २६ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ९० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची, महत्त्वाची तसेच उत्पन्न अपेक्षा जास्त स्रोत असलेले कागदपत्रे जप्त केली.
आपल्या महाराष्ट्र राज्य विधानसभे पासून २०० ते ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक शहरात आयकर विभागाच्या पथकाने सोने चांदीच्या व्यापाऱ्याच्या काही ठिकाणच्या फर्मवर अचानक छापे टाकले, या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.प्राप्तिकर विभागाच्या पथकाने येथून २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त किल्ल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
सुमारे ३० तास आयकर विभागाची छापेमारी सुरू होती.आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तर या व्यापाऱ्यांच्या बंगल्यामधील फर्निचर फोडून नोटा बाहेर काढल्या.
नाशिकच्या या सराफा व्यावसायिकाच्या फर्मवर छापा टाकल्याने संपूर्ण नाशिक विभागातील सोने चांदीच्या व्यापाऱ्यांसह,अनेक बिल्डर्स,डेव्हलपर्स,आणि काही धूर्त व्यवहारातून सोन्या सारखी किंमत आलेल्या शेतजमिनी विकत घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या सुराणा ज्वेलर्स आणि त्याच्या अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. २ दिवस चाललेल्या या धाडीत आयकर अधिकाऱ्यांनी अनेक मूल्यवान महागड्या वस्तू जप्त केल्या.कर चुकवेगिरीच्या संशयावरून आयकर विभागाने ही कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.
अनेक व्यापारी आयकर विभागाच्या अटी,शर्ती, व शासकीय नियम खड्ड्यात घालून काही ठराविक खरेदी विक्रीचे व्यवहार करताना रिझर्व बँकेचे नियमाची पायमल्ली करीत ग्राहकांना आवश्यक पक्के बिल न देता सोयीनुसार बिले तयार करून बनावट दस्तऐवज तयार करून अनेक व्यवहार करून घेत आहेत यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोखीने सुद्धा व्यवहार होतात, इत्यादी अनेक कारणांमुळे व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर होते आणि इतरही जिल्ह्यातील व्यापारी अजून रडारवर आहेत.
नाशिक मध्ये झालेल्या कारवाईत नाशिक,नागपूर आणि जळगावच्या पथकातील ५० अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.अचानक टाकलेल्या छाप्यामुळे करचुकवेगिरी आणि चुकीच्या पद्धतीने व्यवहार करणारे व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वास्तविक,गेल्या काही दिवसांपासून करचुकवेगिरी करणारे व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. ज्या ठिकाणी छापा टाकला गेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
मनमाड शहरात आयटीचा छापा-
नाशिक प्रमाणेच मनमाड शहरातही आयकर विभागाने धाड टाकली आहे. मालेगाव येथील एका व्यावसायिकाच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले.गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभाग पथक राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.या टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता उघडकीस येत आहे. नाशिकमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या घरांवर छापे टाकल्याने संपूर्ण नाशिक विभागात व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा