चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठी आर.के.पाटील ५ हजाराची लाच घेताना लुचपत विभागाच्या जाळ्यात.

यावल दि.२८
चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठी रविंद्र काशिनाथ पाटील वय ५० याने तक्रारदार यास १० हजार रुपयाची मागणी केली त्यापैकी ५ हजार रुपये घेताना जळगाव येथील लाच लुचपत विभाग पथकाने आज मंगळवार दि.२८ रोजी रंगेहात पकडले.
       याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूल मंजुर झालेले होते.घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्याने तलाठी आर.के.पाटील यांनी तक्रारदार यांचे कडेस वाळू ट्रक्टरचे वाहतूकीसाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.त्याबाबत तक्रारदार यांनी काल दि.२७ मे २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली.सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष आज मंगळवार दि.२८ रोजी पडताळणी केली असता तलाठी आर.के.पाटील यांनी पंचा समक्ष ५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली आणि तक्रारदार कडून ५ हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचेवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
         हॅश व्हॅल्यू घेण्यात आली  आहे.सापळा पर्यवेक्षक अधिकारी सुहास देशमुख,पोलिस उप 
अधीक्षक,ला.प्र.वि.जळगांव.मोबा.नं.8806643000 सापळा व तपास अधिकारी अमोल वालझाडे,
पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.जळगांव. सापळा पथक पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर
कारवाई मदत पथक-पो.नि.एन.एन.जाधव,स.फौ. दिनेशसिंग पाटील,पो.हे.कॉ.सुरेश पाटील,
पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर ,
पोना.किशोर महाजन,पो.ना.सुनिल वानखेडे,
पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम,पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391, 2) माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक मो नं 9404333049 , 3 ) नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.मोबा.नं. 
9822627288 यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
      जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.  अल्पबचत भवन,जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव यांच्याकडे संपर्क साधावा
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8806643000
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात