यावल दि.२७
यावल येथील ३ ते ४ पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी फैजपुर शहरात जाऊन मद्य प्राशन करून कारण नसताना एकाची बदनामी करून मारहाण व दांगडो केल्याने संपूर्ण यावल तालुक्यात चर्चेला उधाण आले असून हे प्रकरण दाबण्यासाठी जिल्हास्तरीय पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांच्याकडून फैजपुर पोलिसांवर राजकीय प्रभाव टाकला जात असल्याचे संपूर्ण भुसावळ विभागात चर्चिले जात आहे.परंतु फैजपूर येथील तक्रारदार कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष वेधून असले तरी लोकसभा निवडणूक निकाल ४ जून २०२४ रोजी लागणार असल्याने त्या आधीच यावल तालुक्यात गुंडगिरी आणि दादागिरी सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली निवडणुकीत काम करणारे काही ठराविक,पदाधिकारी कार्यकर्ते यांना एम टॉनिकचा चांगलाच पुरवठा झाला त्यामुळे त्यांनी व्हाट्सअप फेसबुक माध्यमातून प्रसिद्धी सुद्धा करून घेतली तसेच वरिष्ठ नेते मंडळी,जिल्हा पदाधिकारी यांचा आशीर्वाद आणि पाठीमागे असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात हिम्मत वाढली आणि आमचे कोणी काही वाकडे करू शकणार नाही, आमच्यावर कोणी कारवाई करणार नाही असा आत्मविश्वास बाळगून त्यांनी यावलहून फैजपुरात जाऊन मद्य प्राशन करून एकाची कारण नसताना बदनामी करून मारहाण केल्याने तक्रारदार आता पोलिसात जाऊन आपली तक्रार देईल म्हणून तक्रारदारावर राजकीय प्रभाव आणि दडपण आणले जात असल्याने जिल्हास्तरीय पदाधिकारी फैजपुर पोलिसांवर प्रभाव टाकून आपल्या कार्यकर्त्यांच्या दादागिरी आणि गुंडगिरीला खतपाणी घालणार आहेत का..? याकडे यावल रावेर तालुक्यातील राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून आहे.
टिप्पणी पोस्ट करा