एच एस सी परीक्षेत यावल नगरपरिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश.


यावल दि. 21 
सन 2023 - 24 या वर्षातील फेब्रुवारी मार्च 2024 च्या एच एस सी परीक्षेमध्ये पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 100 % तर कला शाखेचा निकाल 91.97 % तसेच वाणिज्य शाखेचा 97.91% निकाल लागलेला आहे.यामध्ये *विज्ञान* शाखेची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी दिनेश पाटील हिने 89.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर सर्वेश किरणकुमार वाणी 88.17% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी तन्वी मंदार गडे 86.83% गुण मिळवून  तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच *वाणिज्य* शाखेतून कुमारी अश्विनी  सुकलाल  ढाके 85.17%  गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर कुमारी गायत्री किशोर पवार हिने  82.67% गुण मिळवून द्वितीय तसेच कुमारी जानवी भरत पाटील हिने 79.17% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. *कला* शाखेतून कुमारी वैष्णवी अर्जुन खलसे 78.50% प्रथम क्रमांक, तर कुमारी काजल ज्ञानेश्वर पाटील हिने 73.50% गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कुमारी सपकाळे रोहिणी आनंदा हिने 72.17% तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे   मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक एम. के. पाटील सर उपप्राचार्य ए. एस. इंगळे सर पर्यवेक्षक  व्ही.ए .काटकर,  व्ही.टी.नन्नवरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.त्यांच्या यशामध्ये सहकार्य करणाऱ्या शिक्षक -शिक्षकेतर यांचे सुद्धा अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात