यावल दि.३०
येत्या आठवड्यात मान्सून सुरू होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको किव्वा दैनंदिन कामकाजात अडचणी यायला नको म्हणून मान्सून पूर्व आढावा बैठक घेण्यात आली आणि त्यात तालुक्यातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांनी दिल्या.
काल बुधवार दि.२९ मे २०२४ रोजी तहसील कार्यालय यावल येथे मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली.त्यात तालुक्यातील सर्व विभागांना त्यांनी करावयाचे मान्सून पूर्व कामकाजा बाबत आणि दक्ष राहण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.यावल फैजपूर नगरपालिकेला नाले आणि गटारी साफ करण्याच्या सूचना दिलेल्या आहे.एमईसीबीला वेळोवेळी झाडे पडून वादळ वाऱ्याने लाईट गेल्यास ती पूर्ववत तात्काळ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.त्याच प्रमाणे पीडब्ल्यूडीला पावसामुळे पूल रस्ते यांचे काही नुकसान झाल्यास त्याची तात्काळ दुरुस्ती होणे बाबत सूचना दिलेल्या आहेत.तसेच कृषी आणि महसूल विभागाला पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे वेळोवेळी तात्काळ प्रभावाने करावयाच्या सूचना दिलेल्या आहेत.इरिगेशन डिपार्टमेंटला पाण्याचा फ्लोची सूचना तसेच वड्री मोर, निंबादेवी,मनुदेवी येथील पाऊस पाण्याचा प्रवाह,
पूरस्थितीबाबत वेळोवेळी अपडेट / माहिती देण्याबाबत कळवले आहे.फॉरेस्ट विभागाला देखील पावसामुळे रस्त्यावर पडलेली झाडे कट करून रस्ता मोकळा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच जर कुठे काही आपत्ती आलीच आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ आली तर त्यासाठी सुद्धा पर्यायी व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे. इत्यादी महत्त्वाच्या सूचना तालुक्यातील संबंधित सर्व विभागाला यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा