सोमवारी यावल येथील व्यास मंदिरात मोफत सल्ला विषयक शिबिर. माहिती अधिकार संघर्ष समितीच्या स्तुत्य उपक्रम.


यावल दि. ६
यावल येथील व्यास मंदिरात सोमवार दि. ८ एप्रिल २०२४   रोजी सकाळी १०:३० वाजता माहिती अधिकार संघर्ष समितीतर्फे मोफत सल्ला विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
    तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत सल्ला विषयक शिबिरात माहिती अधिकार संघर्ष समिती व पालक जनजागृती समिती संस्थापक अध्यक्ष अजय शिवाजी तुम्मे उपस्थित त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 
      मोफत शिबिरात विविध कायद्याची व नियमाची माहिती दिली जाणार आहे, शिबिरात प्रशासन नोकरशाही व सरकारी यंत्रणा कशी काम करते ते माहिती,विविध कार्यालयात लाच न देता आपले काम करून घेता येते,आपल्या आसपासच्या मित्र नातेवाईक शेजारी इत्यादीचे सरकारी कामात अडवणूक होत असेल तर त्याला मदत करता येते,
अनुभवी कार्यकर्ते यांच्या ओळखी होतात त्यातून परस्परांना खूप मदत होते, माहिती अधिकार व्हाट्सअप ग्रुप मधून रोज व सतत माहिती आणि प्रशिक्षण मिळते,व्यक्ती धिट व आत्मविश्वास वाढतो, प्रशासन पारदर्शी व लोकाभिमुख बनविण्यात आपले योगदान देता येते, आपले लिखाणाची मांडणी सुधारते,नागरिक म्हणून आपले हक्क व कर्तव्य याची जाणीव होते. तसेच आयुष्यात तुम्ही कोणतेही काम करा नोकरी करा व्यवसाय करा तुमच्या आवडीच्या संधी मिळेल त्या कोणत्याही क्षेत्रात काम करा पण काही दिवस किमान ३ वर्ष तरी माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून अवश्य काम करा,जीवनात खूप शिकायला मिळते इत्यादी बाबत शिबिरात शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे तरी शिबिरात यावल तालुक्यातील नागरिकांनी,तरुण कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी मुला-मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जुगल श्रीनिवास पाटील,आकाश सतीश चोपडे,अमित सिराज तडवी,दीपक दिलदार तडवी, राहुल लक्ष्मण जयकर यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात