अवैध धंद्यांच्या तक्रारीकडे फैजपुर पोलीसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष.

यावल दि.८ तालुक्यात फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत मारुळ,न्हावी फैजपूर इत्यादी ठिकाणी तसेच महिला आयपीएस पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे आणि त्याची लेखी तक्रार राज्य उत्पादन शुल्क भुसावल विभागाचे निरीक्षक यांच्याकडे केल्यावर सुद्धा अवैध धंदे बंद होत नसल्याने तक्रारदार महिला व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
       राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे निरीक्षक यांच्याकडे आज दि.८ एप्रिल २o२४ रोजी तसेच १८ मार्च २०२४ रोजी फैजपूर भाग फैजपुर डी.वाय.एस.पी यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की मारूळ,न्हावी, फैजपूर इत्यादी गावांमध्ये पवित्र असा रमजान सण सुरू होता आणि आजही आहे आणि त्या आधी सुद्धा गावांमध्ये सट्टा,पत्ता,दारू मोठ्या प्रमाणात सर्रासपणे सुरू असून तरुणांमध्ये दारू पिण्याच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे,सट्टा,पत्ता,जुगार खेळला जात असून त्यांचे व कुटुंबीयांचे भविष्य धोक्यात आले आहे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. दारूमुळे काहींचे निधन सुद्धा झाले दारू पिणाऱ्यांच्या पत्नी विधवा स्त्रीचे जीवन जगत आहे,पवित्र रमजान महिन्यात या अवैधन्यांमुळे मजूर त्यांची पूर्ण मजुरी जुगारामध्ये लावत असून घरी खर्चासाठी एक रुपया सुद्धा आणत नाहीत.यामुळे दारू पिणाऱ्यांच्या मुला- बाळांवर कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे असे असताना देखील अवैध धंदेवाल्यानी कोणालाही न जुमानता गावागावा टपरी  व पान टपऱ्यांवर ठिकठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरू केले आहे,अवैध धंदे चालक म्हणतात पोलिसांना,राज्य उत्पादन शुल्क विभागाला हप्ते देतो आमचे अवैध धंदे कोणीही बंद करू शकणार नाही असे दादागिरीने ग्रामस्थांना सांगत असतात. 
      दि.१८ मार्च २०२४ रोजी फैजपूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सुद्धा अवैध धंदे बंद झालेले नाहीत तरी अवैध धंदे चालकांवर तात्काळ योग्य ती कारवाई करून अवैध धंदे बंद करावे आणि सदरचे अवैध धंदे बंद न केल्यास तक्रारदार महिला व अनेक ग्रामस्थ महिला- पुरुष यांच्यातर्फे फैजपूर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन आज दि.८ एप्रिल २०२४रोजी पुन्हा वरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे,निवेदनावर लताबाई सिताराम तायडे,पिंकी तायडे, शारदाबाई तायडे,पुष्पाबाई तायडे,मराबाई शिमरे,बेबाबाई गावडे,रंजू बाई कोळी,उषाबाई कोळी,मंजुळाबाई शिमरे, संगीताबाई कोळी इत्यादी महिला पुरुषांनी निवेदनावर आपली स्वाक्षरी व नाव लिहून तक्रार केली आहे.तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आता काय कारवाई करणार..? याकडे आता पूर्ण ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात