यावल दि.७
दि. ६ एप्रिल २०२४ रोजी जळगाव येथील कमल पॅराडाईज हॉटेलमध्ये "जळगाव युथ आयकॉन अवॉर्ड २०२४ " आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांत सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,वैद्यकीय, उद्योजक,विधी अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट असे काम करणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात आला.. या कार्यक्रमांमध्ये यावल येथील एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अभय गणेश रावते यांना "जळगाव युथ आयकॉन २०२४ " अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ.अभय रावते यांनी सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या त्यांच्या अमूल्य कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले..कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध मराठी व हिंदी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते डॉ.अभय गणेश रावते यांना जळगाव युथ आयकॉन २०२४ अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.. तसेच कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.निलेश चांडक व डॉ.संदीप जोशी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर अभय रावते यांना युथ आयकॉन २०२४ " अवॉर्ड मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा