यावल दि. 3
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२१ – २२ व सन २०२२ – २०२३ चे लेखापरीक्षण सनदी लेखापरीक्षक सुरेशराव डौले पाटील यांनी करुन ४६,४५, ७९८.९०/- इतक्या रुपयांचा अपहार झाल्याची फिर्याद राहुरी पोलिस स्टेशन येथे दिली होती गु.र. नंबर ०२४५ अन्वये दि. ०६.०३.२०२४ रोजी नोंदली गेली.सदर गुन्हयास भा. द.वि.स. कलम ४०९ , ४२० , ४६५ , ४७७ / अ , ३४ , सह महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संबंधाचे हितसंरक्षण कायदा अधिनियम १९९९ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल झाला.तेव्हा पासून पतसंस्थेचे सर्व संचालक कर्मचारी हे फरार असून व त्यांनी जिल्हा सत्र् न्यायालय अहमदनगर येथे अटकपूर्व जामीन मिळणेसाठी धाव घेतली होती.त्याचा निकाल मंगळवार दि. ०२.०४.२०२४ रोजी चौथे जिल्हा व सत्र् न्यायाधिश मा. एम.एस.लोणे साहेब यांनी दिला असून सर्व संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
त्यामध्ये संस्थेचा व्हाईस चेअरमन शरद लक्ष्मण निमसे , संचालक वसंत कृष्णराव झावरे,किशोर जाधव,संजय शेळके,प्रतिभा पवार,मंगल साबळे,दादाभाऊ यादव, कर्मचारी सुनिल भोंगळ,उत्तम तारडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.यामध्ये ठेवीदारांनी संचालकांविरुध्द त्रयस्थ पक्ष म्हणून याचीके विरुध्द सहभाग नोंदविला होता.या गुन्हायातील आरोपी चेअरमन भाऊसाहेब तुकाराम येवले व मॅनेजर कारभारी बापूसाहेब फाटक हे अदयापही तुरुंगात आहेत.तसेच आरोपी संचालक मंदा शरद निमसे ही लंडन येथे पळून गेली असल्याचे समजते.
सर्व आरोपींचे जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळल्या मुळे ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
यामुळे सहकार क्षेत्रात होत असलेल्या भ्रष्टाचारास निश्चितच आळा बसेल असा विश्वास भारतीय जनसंसदचे तालुका अध्यक्ष कुमार डावखर यांनी व्यक्त केला आहे.गुन्हा- नोंद झाल्या पासून राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अदयाप पर्यत एकाही आरोपीस अटक केलेली नाही. एका लपून बसलेल्या संचालकाचा पत्ता् ठेवीदारांनी पोलिसांना देवूनही,पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.त्यांमुळे राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या शेकडो ठेवीदरांनी नारजी व्यक्त करुन आरोपींना लवकरात लवकर अटक न केल्यास सर्व ठेवीदारांच्या वतीने अहमदनगर येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय येथे आमरण उपोषण करणार असल्याचे भारतीय जनसंसद व ठेवीदार बचाव कृती समिती यानी जाहिर केले.
टिप्पणी पोस्ट करा