यावल आगारातून न्हावी मार्गे तिड्या, मोहमांडली, अंधारमळी बस सेवा सुरू करा - डॉ. कुंदन फेगडे


यावल दि.२७ 
यावल न्हावी मार्गे तिड्या मोहमांडली,अंधारमळी तालुका रावेर या मार्गे तात्काळ बस सुरु करावी अशी मागणी यावल येथील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय सदस्य,समाजसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी यावल आगार प्रमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
      आज दि.२७ एप्रिल २०२४ रोजी यावल आगार प्रमुख यांच्याकडे दिलेल्या निवेदनात डॉ.कुंदन फेगडे यांनी नमूद केले आहे की अंधारमळी,मोहमांडली,तिड्या ही गावे अतिशय दुर्गम आदिवासी भागातील आहेत,आदिवासी परिसरातून यावल, न्हावी, फैजपूर, सावदा या शहरामध्ये जीवनावश्यक वस्तू साहित्य खरेदीसाठी तसेच शिक्षण किवा औषध उपचारासाठी येथे प्रवास करणारे असंख्य आदिवासी बांधव इतर नागरिक मोठ्या संख्येने आहेत.तसेच प्रवास करून शिक्षण घेणारे विध्यार्थी या मार्गाने ये - जा करीत असतात व मुली,महिला व जेष्ठ नागरिकांचा प्रवास एसटी बसनेच सुरक्षित व सोयीचा होतो.त्यात सध्या लग्न समारंभ सुरु असतांना अनेकांना जास्तपैसे देऊन खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. गरिबांना परवडणारे एसटी बस हेच प्रवासाचे एकमेव साधन आहे, प्रवासात येणाऱ्या अडचणीमुळे या गावातील नागरिकांचा प्रचंड रोष लोकप्रतिनिधी आणि एस.टी.महामंडळावर आहे तरी शक्य तितक्या लवकर सदर बस सेवा सुरु करावी.सध्या तापमान वाढीमुळे मोटार सायकलवर प्रवासात उन्हाचा फटका,उष्माघात होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने एस.टी.चा प्रवासच सुखकर आहे तरी होईल तितक्या लवकर यावल आगारातून एस.टी.यावल न्हावी मार्गे तिड्या मोहमांडली,
अंधारमळी मार्गे सुरु करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात