संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध अट्रावल येथील मुंजोबाने सोमवती अमावस्येच्या पूर्वसंध्येला घेतला अग्नीडाग.


यावल दि.७ 
दरवर्षी माघ महिन्यात पौर्णिमेपर्यंत अट्रावल येथील मुंजोबाची यात्रा दर शनिवारी आणि सोमवारी भरत असते त्यानिमित्ताने संपूर्ण खानदेशातील भावी मोठ्या संख्येने मुंजोबाचे दर्शन घेऊन मानलेले मान देण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात.पंधरा दिवसाची यात्रा संपल्यानंतर महिना दोन महिने तीन महिन्यात केव्हाही कोणत्याही वेळेस अट्रावल येथील मुंजोबा अग्नीडाग घेत असतो,अग्नि डाग म्हणजे मुंजोबा वर चढवलेला लोणी व पूजेचे साहित्य अचानक पेट घेत असतो याला भाविकांमध्ये नागरिकांमध्ये एक चमत्कार आणि आख्यायिका असल्याचे बोलले जाते. 
      अशाप्रकारे आज रविवार दि.७ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी १९:२० वाजेच्या सुमारास म्हणजे सोमवती अमावस्येच्या पूर्वसंध्येला अट्रावल येथील मुंजोबाने अग्निडाग घेतल्याने अट्रावल परिसरातील अनेक भाविकांनी एकदा पुन्हा मुंजोबाचे दर्शन घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात