बोरावलगेट जवळ खंडेराव मंदिर परिसराकडे यावल नगरपरिषदेचे दुर्लक्ष. बारा गाड्या यात्रा बघणाऱ्यांना अडचण.


यावल दि.२२
बोरावल गेट जवळ बोरावल रस्त्यापासून म्हणजे खंडेराव मंदिरापासून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आज सोमवार दि.२२ रोजी संध्याकाळी सालाबाद प्रमाणे होणार आहे परंतु या परिसरात यावल नगरपालिकेने काटेरी झाडे झुडपांची साफसफाई न केल्याने बारागाड्या यात्रा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा अडथळा निर्माण होणार आहे.यावल नगरपालिकेजवळ अजून ५ ते ६ तास वेळ असल्याने त्यांनी तात्काळ काटेरी झाडे झुडपांची साफसफाई करावी अशी यावल शहरातून मागणी होत आहे.
       यावल बोरावल गेट जवळून बोरावल रस्त्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ सुरू असते. बोरावल गेट दरवाजाजवळ समोर वळणावर यावल येथील भुसावल नाक्याकडून येणारे वाहन आणि बोरावल कडून यावल बस स्टॅन्ड कडे जाताना वळणावर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे यांची वाढ झाली आहे समोरच्या वाहनधारकांना नागरिकांना कोण येत आहे हे दिसून येत नसल्याने या ठिकाणी एखाद्या वेळेस मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे यावल नगरपरिषदेने या ठिकाणचे काटेरी झाडे झुडपे आपल्या नगरपालिकेच्या जेसीपी मशनरीच्या साह्याने तात्काळ काढून साफसफाई करावी अशी यावल शहरातून सर्व स्तरातून मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात