भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर. उपाध्यक्षपदी- अतुल चौधरी.

यावल दि.१७ 
भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष उमेश रमेश कासट यांनी नुकतीच जाहीर केली त्यात यावल येथील अतुल प्रभाकर चौधरी या यशस्वी,प्रिय व्यापाऱ्याची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
       भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारणी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन,प्रदेश महामंत्री विजय चौधरी,प्रदेश मुख्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे,जिल्हाध्यक्ष अमोल दादा जावळे यांच्या सूचनेनुसार तसेच मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश कासट यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली त्यात यावल येथील अतुल प्रभाकर चौधरी यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
  प्रसिद्धी पत्रक बघितले असता कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष चोपडा तालुक्यातील अडावद येथील  उमेश रमेश कासट,तर सहसंयोजक पदी बोदवड येथील गोपाल कन्हैयालाल अग्रवाल,मुमावस येथील विकास पाचपांडे यावल येथील स्वप्निल रवींद्र देवरे, मुक्ताईनगर येथील पुनम मोतीलाल जैन यांची तर उपाध्यक्ष म्हणून यावल येथील अतुल प्रभाकर चौधरी जामनेर येथील किरण शांताराम पाटील भुसावळ येथील अजय जयपाल नागराणी रावेर येथील लक्ष्मण काशिनाथ शिंदे बोदवड येथील देवेश मनोज कुमार बर्डिया चोपडा येथील प्रवीण गौतमचं जैन भुसावळ येथील सागर सुनील अग्रवाल यांची तर चिटणीस म्हणून भुसावळ येथील संग्रामसिंग पाटील चोपडा तालुक्यातील अडावद येथील निखिल राजेंद्र जैन बोदवड येथील मुरलीधर रूप चंदाने यावल येथील मनोज वायकोळे भुसावळ येथील केशव गेलानी निलेश पंढरीनाथ पाटील तर धानोरा येथील प्रीतम ईश्वर पाटील यांची सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली सदस्य म्हणून भुसावळ येथील गोविंद हेडा,मुकेश नंदानी,सोपान पाटील,पंकज पटेल,भूषण वंत, मोहन कासार सचिन अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. 
     वरील सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे,खासदार रक्षाताई खडसे,आमदार संजय सावकारे,बेटी बचाव बेटी पढाव राष्ट्रीय संयोजक डॉक्टर राजेंद्र जी फडके,रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदूभाऊ महाजन,अशोक भाऊ कांडेलकर,अजयभाऊ भोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील,
हिरालालभाऊ चौधरी,डॉक्टर केतकी पाटील,व्यापारी आघाडी मनोज बियाणी, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील,परीशीत बराटे,अतिश झाल्टे,हरलाल कोळी, वैशालीताई कुलकर्णी,यांनी तसेच यावल तालुक्यातून
मधुकर कारखान्याचे माजी चेअरमन शरददादा महाजन तालुका अध्यक्ष उमेश फेंगडे, शहर अध्यक्ष राहुल बारी, भूषण फेंगडे,योगेश चौधरी,  रितेश बारी,बाळू फेंगडे, विलास चौधरी,उज्जेनसिंग राजपूत इत्यादी यावल रावेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात