धार्मिक स्थळाजवळ नालासफाईसाठी व जागोजागी गटारीवरील तुटलेल्या ढाप्यांबाबत यावल नगरपरिषदेला दिले लेखी निवेदन.


यावल दि.२६
यावल नगरपरिषद हद्दीत धार्मिक स्थळाजवळ म्हणजे आयेशा मज्जिद जवळ नाला साफसफाई करण्यासाठी तसेच जागोजागी गटारीवर तुटलेले ढापे तात्काळ बांधकाम करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन यावल नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडे आज मंगळवार दि.२६ मार्च २०२४ रोजी देण्यात आले.
       मोहम्मद अशपाक शहा अब्दुल गफ्फर शहा रा. गणपतीनगर,आयेशा मज्जिद जवळ व सोहल रुबाब पटेल यांनी यावल नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आयेशा मज्जिद जवळ  तथा धार्मिक स्थळा जवळ नाल्याची साफसफाई न झाल्याने पर्यायी घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे नाल्याची साफसफाई तात्काळ करून कीटक,मच्छर,डास नाशक फवारणी करावी, तसेच यावल शहरात नगरपालिका हद्दीत जागोजागी तुटून पडलेले गटारीचे ढापे दुरुस्त करणे किंवा नवीन बांधकाम करावे,
     गेल्या दोन वर्षापासून नगरपालिकेत प्रशासक राजवट सुरू असल्याने नागरिकांना विविध समस्यांबाबत तसेच कार्यालयात संबंधित अधिकारी कर्मचारी विभाग प्रमुख कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याने सोयीनुसार कामे करीत आहेत त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे वारंवार तक्रारी देऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे तरी तक्रार अर्जावर तात्काळ कारवाई करून यावर शहर स्वच्छ सुंदर आणि आरोग्य युक्त करावे असे सुद्धा तक्रारदार मोहम्मद अशपाक शहा,सोहल पटेल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात