राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी केली यावल शहराध्यक्षपदी योगेश पाटील यांची नियुक्ती.


यावल दि.२६
भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षाचा मेळावा मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात भुसावल परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी यावल शहराध्यक्षपदी योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
      भुसावळ येथे अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल शहराध्यक्षपदी योगेश नारायण पाटील यांची नियुक्ती करून सत्कार करण्यात आला.यावेळी भुसावळ परिसरातील व यावल तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया उपस्थित होते युवक जिल्हा सरचिटणीस जुगल पाटील, युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे,तालुकाध्यक्ष रॉकी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात