यावल दि.१
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे यांनी यावल तालुकाध्यक्षपदी रितेश उर्फ रॉकी पाटील,तसेच युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे,
यावल शहराध्यक्षपदी राकेश करांडे या तरुण तडफदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियुक्ती करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्कम फळी तयार केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे यांच्या भुसावळ येथील कार्यालयात यावल तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, उपजिल्हाध्यक्ष गुणवंतभाऊ नीळ हे उपस्थित होते खालील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावल तालुकाध्यक्ष रितेश उर्फ रॉकी पाटील यांची निवड करण्यात आली तर युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे आणि यावल शहराध्यक्षपदी राजेश करांडे यांची नियुक्ती करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे युवक जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाटील युवक जिल्हा सरचिटणीस जुगल पाटील शहराध्यक्ष राजेश करांडे तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे शहर उपाध्यक्ष चेतन सपकाळे यांचे नियुक्ती करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर यावल तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा