दोन्ही पायांनी अपंग व्यक्तीची आत्महत्या की हत्या..? अंत्यसंस्कार सुरू असताना पोलिसांनी प्रेत शवविच्छेदनासाठीआणले ग्रामीण रुग्णालयात. यावल शहरात चर्चेला उधाण.

यावल दि.२६ 
यावल शहरात एका ५५ वर्षीय अपंग तथा दिव्यांग व्यक्तीने आत्महत्या केली की कोणी हत्या केली..? या चौकशी कामी पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलिसांनी आज मंगळवार दि.२६ रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास यावल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना ते प्रेत शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असली तरी याबाबत अद्याप यावल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावर अ.मृ.नोंद झाल्याचे समजले.
       यावल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जळगाव येथील मेहरूण परिसरात महादेव मंदिराजवळ पूजा विक्रीची लोडगाडी असलेले निलेश नारायण वाणी यांनी खबर दिली की,यावल पोलीस स्टेशनला हजर राहुन खबर लिहुन देतो कि,माझा सख्खा चूलत भाऊ वाळू लक्ष्मण वाणी व काकू श्रीमती सावित्रीबाई लक्षमण वाणी हे यावल शहरात रेणूका मंदिरा जवळ राहतात.बाळू लक्ष्मण वाणी हा दोन्ही पायांनी जन्मा पासून अपंग आहे.त्याचे जवळ अपंगाचे प्रमाणपत्र आहे.त्याचे
शिक्षण इयत्ता ४ पर्यंत झाले आहे.आज मंगळवार दि.२६ मार्च २०२४ रोजी रात्री मला मोठा भाऊ राजेश नारायण वाणी याने फोनव्दारे कळविले
कि,चूलत भाऊ वाळू लक्ष्मण वाणी याने त्याचे राहते घरात फाशी घेतली असून तो फासावर लटकलेला आहे असे
कळविल्याने मी आज रोजी सकाळी यावल येथे माझे कुटूंबीयांसह आलो.भाऊ बाळू लक्ष्मण वाणी वय -५५ यास
गल्लीतील लोकांनी फासावरून खाली जमीनीवर उतरविले होते.तो मयत झालेला होता.त्याचे गळया भोवती गळफासाचे व्रण दिसत होते.त्याठिकाणी आमचे भाचे मनोज बाळु वाणी रा.पांडूरंग नाथनगर भुसावळ,रमाकांत
सुदाम नेवे रा.गुजरअडी चोपडा हे पण हजर हाते.त्यानंतर आम्ही नातेवाईकांनी यावल पोलीस स्टेशनला कळविले.
त्यावरून पोलीसांनी भाऊ बाळू लक्ष्मण वाणी याची तपासणी केली आहे.चुलत भाऊ वाळू लक्ष्मण वाणी याचे
मरणाबाबत पुढील कार्यवाई होणेस विनंती केली आहे. अशाप्रकारे यावल पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली आहे.
        आत्महत्येची घटना घडलेली असली तरी दोघा पायांनी अपंग व्यक्ती गळफास घेऊ शकते का..? हा प्रश्न उपस्थित होत असून गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे कोणाकोणाची हितसंबंध होते आणि त्याला कोणाकडून दमदाटी दिली जात होती का..? त्याने स्वतःहून गळफास घेतला की त्याला कोणी गळफास दिला..? किंवा अन्य कारणावरून हत्या करण्यात आली आहे का..? इत्यादी अनेक प्रश्न यावल शहरात उपस्थित केले जात असून याप्रकरणी यावल पोलिसांच्या चौकशी व तपासाअंती काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.या घटनेमुळे शहरातून कोण कोण फरार झाले..? याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात