यावल दि.५
दरवर्षी प्रमाणे किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचा स्वागत सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रमाचे मागील 20 वर्षांपासून शिरसाड येथील माजी ग्रामपंचायत उपसरपंच धनंजय एकनाथराव पाटील सर व विं.का.सोसायटीचे माजी चेअरमन आर. ई.पाटील सर व पाटील परिवाराकडून आयोजन करण्यात येत असते यावर्षी या कार्यक्रमात तालुक्यातील भाविक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडी सोहळा कार्यक्रमात प्रामुख्याने
शेतकरी खरेदी विक्री संघाचे नवनियुक्त चेअरमन ह.भ.प.नरेंद्र दादा नारखेडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरददादा महाजन यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले.यावेळी शेतकरी खरेदी विक्री संघाचे नवनियुक्त व्हॉईस चेअरमन तेजस धनंजय पाटील, विद्यमान संचालक प्रवीण वारके,
अतुल पाटील,माजी संचालक चंद्रशेखर चौधरी, यावल येथील पी.एस.सोनवणे सर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील,सूर्यभान पाटील सर, संजय पाटील,यावल पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पाटील,भाजपा सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे,सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी,माजी सभापती रवींद्र पाटील,साकळी गावाचे सरपंच दीपक पाटील,प्रगतीशील शेतकरी साहेबराव बडगुजर,डॉ वाय.जी.नेवे,साकळी वि.का. सोसायटीचे चेअरमन अरुण खेवलकर,संचालक सुनील नेवे,मोहन बडगुजर, डॉ.सुनील पाटील,किनगाव येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत चौधरी,डॉ.योगेश पालवे,भाजयुमो तालुका उपाध्यक्ष योगेश खेवलकर,पत्रकार चंद्रकांत नेवे यांसह तालुक्यातील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते,शेतकरी खरेदी विक्री संघ कर्मचारी उपस्थित होते.दिंडीचा स्वागत सोहळा झाल्यानंतर महाराजांनी प्रवचन केले व पाटील परिवाराचे महाप्रसादा बद्दल आभार मानले.यानंतर महाप्रसाद सोहळ्याला सुरुवात झाली.दिंडीचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.महाप्रसाद घेतल्यानंतर दुपारी दिंडीचे प्रस्थान यावलकडे झाले.शिरसाड येथील पाटील परिवार अखंडपणे वारकऱ्यांची सेवा करीत असल्याने परिसरात भाविकांकडून त्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा