जळगाव येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन ! बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी ! पूज्य भिडे गुरुजी यांना सुरक्षा प्रदान करावी !

यावल दि. ६ 
बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत सातत्याने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत.गेली अनेक वर्षे बंगालमधील संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.याची दखल राज्य पोलिसांनीही घेतलेली नाही. तेथे सामान्य हिंदु नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होईल अशी स्थिती नाही, त्यामुळे तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात एकमताने करण्यात आली. सकाळी १०:३० वाजता जळगाव महानगर पालिकेच्या समोर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु महासभा, राष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे निखिल कदम यांनी केले.आंदोलन झाल्यावर जिल्हाधिकारी यांना सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आकाश फडे,हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, अधिवक्ता निरंजन चौधरी,योग वेदांत सेवा समितीचे अनिल चौधरी,राष्ट्रीय बजरंग दलाचे सहमंत्री प्रविण कोळी,हिंदु जनजागृती समितीचे निखिल कदम,गजू तांबट,रणरागिणी शाखेच्या कु. धनश्री दहीवदकर,धर्मप्रेमी पंकज वराडे यांनी संबोधित केले. मुलींवर अत्याचार करणाऱ्या नगर जिल्ह्यातील 'विनियार्ड ब्लेसेड चर्च'च्या पास्टरवर कठोर कारवाई करा !
     सोनई, तालुका नेवासा, जिल्हा नगर येथील विनियार्ड ब्लेसेड चर्चचे पास्टर सुनील गंगावणे,
पास्टर उत्तम वैरागर, पास्टर संजय वैरागर यांनी अल्पवयीन दोन मुलींना 'तिच्या आजीला झालेला आजार बरे करण्याचे औषध देतो', असे सांगत त्यांना चर्चमध्ये बोलावून सतत लैंगिक अत्याचार केला. गावातील काही सजग युवकांनी याचे चित्रीकरण केल्याने हे दुष्कृत्य बाहेर आले. त्यामुळे या तीनही पास्टरवर कठोरात कठोर कारवाई करून यांच्या चर्चमध्ये अशी दुष्कृत्ये चालतात का ? याची चौकशी करण्याची मागणी आंदोलनात केली गेली.

ऋषितुल्य पूज्य भिडे गुरुजी यांच्यावर आक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा !

        नुकतेच मनमाड ( जिल्हा नाशिक ) येथे पूज्य भिडे गुरुजी यांचे वाहन अडवून त्यावर काही समाजकंटकानी आक्रमण केले.त्यांवर कारवाई करण्यात यावी,तसेच त्यामागे कोणाचा कुटील हात आहे हे शोधून काढून त्यांनाही कारावासात डांबावे अन् पूज्य गुरुजींना सुरक्षा प्रदान करण्यात यावी,अशी मागणीही करण्यात आली असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात हिंदु राष्ट्र जागृती आंदोलक प्रशांत हेमंत जुवेकर यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात