यावल तालुक्यात होणारी गोहत्या थांबविण्याची मागणी. मानद पशु कल्याण अधिकाऱ्याने दिले यावल तहसीलदार यांना निवेदन.

यावल दि.५ 
यावल शहरात व तालुक्यात सर्रास बेकायदा अनधिकृत होणारी " गोहत्या " थांबवावी या संदर्भात यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना महाराष्ट्र राज्य मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांच्यासह ' गो ' प्रेमी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले,या संदर्भात यावल  महसूल व फैजपूर भाग डिवायएसपी,उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि यावल व फैजपूर नगरपरिषदेचे प्रभारी प्रशासक काय कारवाई करणार..? याकडे ' गो - प्रेमी, ' गो ' रक्षक याचे लक्ष वेधून आहे. 
   आज मंगळवार दि.५ रोजी यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,राज्यात गोहत्या बंदी असल्यावर देखील कायद्याचे उल्लंघन करत कसाई हे गोमातेची व‌ गोवंशाची हत्या करत आहे ज्या गोमातेने अमृत दुध पाजले, ज्या नंदीजी ( वृषभ / बैल  ) देवांनी सोन्याची असलेली शेती मशागत व फुलवित मेहनत घेऊन अन्नधान्य निर्माण कार्यात आपले योगदान दिले आहे आणि आज पण देत आहेत त्यांचीच खुलेआम कायदा हत्या होते हे आपल्या देशासाठी घातक आहे जर गोमाता व‌ नंदीजी नसले तर भयावह.परिणाम निर्माण होतील तरी गोमाता ही सर्वांचा आधार आणि दैवत आहे याची दखल घेत गोहत्या करणाऱ्या कसाईला कठोर शासन करावे असे निवेदन गोप्रेमी कडुन देण्यात आले,महाराष्ट्र राज्य मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले,समाधान कोळी,
निलेश कोळी,शंकर कोळी,
समाधान बाविस्कर,यश कोळी,
स्वप्निल कोळी,विकास सोनवणे इत्यादी गोप्रेमी बांधवांनी यावल तहसीलदार यांना निवेदन दिले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात