यावल दि.१३
कमार ( एस.टी. )जमातीची तस्सम जमात असणाऱ्या लोहार व तिच्या उपजमातींना अनुसूचित जमाती (एस.टी.) च्या सवलती त्वरित लागू करणे बाबत लेखी निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे समस्त लोहार समाजाने दि.१२ मार्च २०२४ रोजी दिले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोहार व तिच्या तत्सम जगाती फारच मागासलेल्या असून अत्यंत निकृष्ठ व हलाकीचे जिवन जगत आहे.त्यामुळे मध्यप्रांत व वऱ्हाड राज्यांचे १९४१ व १९५८ च्या आदेशानुसार लोहार जमातीला आदिम जमाती (एस.टी.)च्या सवलती लागू केलेल्या होत्या. पुढे विदर्भ प्रदेश १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला.
त्यामध्ये लोहार जमात एस.टी.च्या यादीतून वगळण्यात आले. परंतू या यादिमध्ये कमार जमातीचा उल्लेख क्रमांक २० वर केलेला आहे.कमार म्हणजेच लोहार अशी नोंद समाजशास्त्रीय व मानवंश शास्त्रीय जुन्या दस्त एवजात नमुद असल्याने आढळून आलेले आहे.त्यामुळे केंद्र शासनाने १९७६ च्या अमेंटमेंटच्या आदेशामध्ये कमार जमातीच्या तत्सम जमाती म्हणून महाराष्ट्रातील लोहार व तत्सम जमातीचा समावेश करुन पुर्वीचे एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण पुर्ववत सुरु करावे व झालेला अन्याय त्वरीत दुर करावा,अशी शासनाला सन २०२० पासून विनंती करण्यात आलेली आहे.व बराच पाठपुरावा करण्यात आलेला आहे.
परंतू शासनाने ही मागणी अद्यापही मंजूर केलेली नाही.तरी हे निवेदन प्राप्त होताच त्वरीत कार्यवाही करुन लोहार व तिच्या तत्सम उपजमातीस अनुसुचीत जमातीची (एस.टी.) ची सवलत त्वरीत लागू करण्यात यावी ही विनंती.अन्यथा महाराष्ट्रातून या जमातीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल,याबाबत शासनाने नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात चेतन वामन सनासे,ललित वासुदेव सपकाळे, अनिल मधुकर लोहार,पुंडलिक दगडू सूर्यवंशी, पंढरीनाथ किसन लोहार यांनी दिले तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदन देताना लोहार समाजाचे युवा नेते
अनिल मधुकर लोहार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले त्यावेळी पुंडलिक सुर्यवंशी,चेतन सनांसे, पंढरीनाथ चव्हाण,ललित सपकाळे,
युवराज खैरे,व इतर लोहार समाज बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा