राजोरा फाटा ते निमगाव दरम्यान बिबट्याचे झाले दर्शन. पोलीस आणि वन विभागाची मात्र चुप्पी.

यावल दि.२९ 
मार्च महिन्यात उन्हाळ्याचे तापमान जसजसे वाढत आहे तसतसे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी आणि थंडावा मिळण्यासाठी वाटेल तिकडे भटकंती करीत असल्याने एक बिबट्या परवा बुधवार रोजी रात्री ग्रामस्थांना व पेट्रोलिंग करणाऱ्या एका पोलिसाला दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली.
            रात्रीच्या वेळेस राजोरा गावाजवळील बाहेरील वस्ती मधील रहिवाशांना तसेच राजोरा फाटा ते निमगाव दरम्यान म्हणजे भुसावळ रोडवर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसाला बिबट्याचे दर्शन घडले असले तरी याबाबत मात्र पोलीस आणि यावल पूर्व वनक्षेत्रपाल फटांगरे यांच्या वन कर्मचाऱ्यांनी निमगाव परिसरात बिबट्याला पकडण्याचे कोणतेही साहित्य आपल्या सोबत न घेता बिबट्याची पाहणी केली परंतु बिबट्या दिसला नाही, उन्हाळ्याचे तापमान लक्षात घेता बिबट्या या परिसरात केळीच्या बागांमध्ये कुठेतरी लपून असेल असे सुद्धा ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. असल्याचे बोलले जाते परंतु याबाबत त्यांनी नागरिकांना माहिती पडू नये म्हणून गप्प राहण्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
       शेळगाव बॅरेज मध्ये पाणी अडविल्याने  तसेच वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी तसेच आपले भक्ष्य शोधण्यासाठी तसेच भुसावळ जवळील तापी नदी पूलापासून पिळोदा, अंजाळे,बोरावल,टाकरखेडा भालशीव, पीप्री शिवारात भटकंती करण्यासाठी नैसर्गिक दर्या खोऱ्यांचे तसेच बागायती पिकांचे पोषक असे वातावरण परिसर निर्माण असल्याने वन्य प्राण्यांना पोषक असे वातावरण निर्मिती झाली आहे वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून ते या भागात राहणे पसंत करतील पर्यायी नागरिकांनी शेतकऱ्यांनी सावध राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यासाठी वन विभागाने सर्वतोपरी पर्यायी उपाय योजना राबविल्या पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. आणि अशी पर्यायी व्यवस्था वन विभागाने न केल्यास वरील शिवारात वन्य प्राण्यांपासून प्राण आणि होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात