पाटबंधारे विभागात वाहने भाडे तत्त्वावर लावण्याचे प्रक्रियेत मोठा घोळ.


यावल दि.१३ 
जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या विभागात काही कार्यालयांतर्गत विविध कामांसाठी देखरेख करण्यासाठी वाहने भाडे तत्त्वावर लावण्याचे प्रक्रियेत मोठा घोळ उघडकीस आला आहे.
        याबाबत सविस्तर माहिती अशी की माहिती अधिकार कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे रा. नशिराबाद ता.जि.जळगांव यांनी दि.१२ मार्च २०२४ रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की आपणांस पुनश्च एकदा विनंती करितो की संदर्भीय पत्र क्र. १ नुसार सखोल चौकशी होणेस विनंती आहे.उदाहरण म्हणून खालील प्रकरण आपले माहितीसाठी व कार्यवाहिसाठी प्रस्तुत करीत आहे.खाजगी वाहन भाडे तत्वावर वापरणे बाबत
१) सन २०२० मध्ये या बाबत विभागीय कार्यालयाने दरपत्रक काढले दि. १३/०१/२०२०. परंतु संबंधित कार्यकारी अभियंता यांनी सदर दरपत्रक मंजुर करताना मात्र दि. १३/०१/२०१९ असे आहे. तसेच वाहन भाडे तत्वावर लावणे बाबत संबंधित मक्तेदाराला जाक्र./जमप्रवि क्र.२/भांशा ०३/२१९/२०२० दि.२२/०१/२०२० या पत्राद्वारे दिनांक ०१/०९/२०१९ पासून वाहन उपलब्ध करून द्यावे असे कळविले आहे.तसेच शर्ती व अटीनुसार कार्यवाही झालेली नाही. तरी पण कार्यकारी अभियंता यांनी संबंधित दर पत्रक मंजूर केले आहे मक्तेदारांच्या दरपत्रकावर दिनांक नाही. तरीपण कार्यकारी अभियंता यांनी संबंधित दर पत्रक मंजुर केलेले आहे.मक्तेदारांनी दरपत्रक कार्यालयात कधी दिलेले आहे याची काहीही नोंद नाही. (पाकीटांवर) तसेच शर्ती व अटीची पुर्तता झालेली नाही. तसेच कोणत्या नंबरचे वाहन लावण्यात आलेले आहे हे नमुद नाही.सन २०२१ मध्ये भाडे तत्वावर वाहन न लावता भ्रष्टाचार झालेला आहे असे वाटते. ३) सन २०२२ जाक्र/जमप्रविक्र२ भांशा/०३/५२/सन २०२२ दि. ०७/०१/२०२२ नुसार मक्तेदाराला वाहन लावण्याबाबत कळविले आहे. मात्र त्या पत्रात मक्तेदाराचे दरपत्रक हे दि. ३०/०१/२०२२ ला कार्यालयात दिलेले आहे असे दिसते.पत्र मात्र दि.०७/०१/२०२२ दिले आहे हे कसे शक्य आहे. 
वाहन क्र. एम.एच.०५ बी. एस. ३१२५ नोंदणी दि. ०५/०६/२०१३ अशी आहे. मात्र शर्तीनुर सन
२०१६ नंतरचे वाहन टुरीस्ट पासींग हवे आहे. शर्ती व अटींची पुर्तता केलेली नाही. ४) सन २०२२ - शर्ती व अटींची पुर्तता केलेली नाही. ५) सन २०२२ - शर्ती व अटींची पुर्तता केलेली नाही.
वरील अनु.नं. १ ते ५ मध्ये आर.टी.ओ. कार्यालयाचे परमीट नाही.तरी अधिकारी कोणत्या रिस्क वर प्रवास करीत होते.तरी भाडे तत्वावर वाहन उपलब्ध करणे कामाबाबत वरीलप्रमाणे अनियमितता आहे. तरी त्यांचे अधिपत्त्याखालील क्षेत्रीय कामात किती असेल याची कल्पना येते. तरी महाशया नम्र विनंती की संदर्भीय १
पत्राचेचे अवलोकन करून चौकशी व्हावी अन्यथा मला नाईलाजास्तव आपले कार्यालयासमोर
दि.१०/०४/२०२४ रोजी उपोषण करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी असे दिलेल्या लेखी पत्रात नितीन रंधे यांनी म्हटले आहे तरी तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक काय निर्णय घेणार याकडे आता नितीन रंधे यांच्यासह संपूर्ण पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधून आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात