यावल दि.१३
जळगाव व यावल तहसीलदार यांच्या संयुक्तिक पथकाची एकाच दिवशी,एकाच वेळेला शेळगाव बॅरेज जवळ बेकायदा अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारांवर मोठी कारवाई करण्यात आली घटनास्थळावरुन १ जेसीपी मशीन व वाळूने भरलेले १ डंपर यावल तहसील कार्यालयात जमा करण्यात आले ही बेधडक कारवाई मंगळवार दि.१२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केल्याने अवैध खाऊन खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली.
जळगाव व यावल तालुक्याच्या हद्दीवर तापी नदीवरील शेळगाव बॅरेज परिसरातून तापी नदीपात्रातून विनापरवाना अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून सरासपणे वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने यावल तहसीलदार सौ.मोहन माला नाझीरकर तसेच जळगाव तहसीलदार यांनी संयुक्तपणे पोलिस व महसूल पथकाच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेस अचानक धाड टाकून घटना स्थळावरून १ जेसीपी मशीन व वाळूने भरलेले १ डंपर ताब्यात घेऊन यावल तहसील कार्यालयात दोघं वाहन जप्त केले.
शेळगाव बॅरेज परिसरातून जळगाव व यावल तालुका हद्दीतून दररोज अवैध गौण खनिजाची वाळू व पिवळी माती वाहतूक ( नदीतील गाळ वाहतूक नावाखाली ) चोरट्या मार्गाने सर्रासपणे बोरावल, भालशिव,टाकरखेडा मार्गे यावल तालुक्यात तसेच शेळगाव,भादली,आसोदा परिसरातून जळगाव तालुक्यात सर्रासपणे वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्याने आज प्रथमच जळगाव व यावल तहसीलदार यांनी संयुक्तपणे कारवाई केल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली या प्रकारे पोलीस बंदोबस्तात अवैध गौण खनिज कारवाईत सातत्य राहणार असल्याचे महसूल व पोलीस विभागात बोलले जात आहे ही कारवाई केल्याची माहिती यावल महसूल विभागाकडून मिळाली.
जळगाव व यावल तालुका महसूल विभाग आपल्या कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनधारक मालक,चालक यांची माहिती पूर्ण नाव गाव पत्त्यासह वाहन नंबरसह तसेच त्याचे कोणते कोणते उद्योग धंदे आणि कोणाच्या प्रभावाखाली कोणाशी संबंधित राहून बेकायदा व्यवसाय करीत आहे आणि त्या वाहनांची नोंदणी आरटीओकडे अधिकृतरित्या केली आहे किंवा नाही..? किंवा ती वाहने कुठून आणलेली आहेत..? याची माहिती संकलित करून यापुढे पोलीस बंदोबस्तात कडक कारवाई करणार असल्याचे समजले.
टिप्पणी पोस्ट करा