माध्यमिक शिक्षक संघटनेच्या तातडीच्या मीटिंग मधून काय साध्य होणार..? आयपीएस अधिकाऱ्यावर राजकीय,शैक्षणिक,सामाजिक प्रभाव पडणार..?



यावल दि.११
गेल्या आठवड्यात फैजपूर उपविभाग फैजपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी कॉपी केंद्रावर भेटी दिल्या त्यात कॉपी केल्याचे आढळून आल्याने तसेच कारवाई केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
    कॉपी प्रकरणात केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक,
मुख्याध्यापक यांच्या विरोधात कारवाई होत असल्याने तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांची संघटनेची आज सोमवार दि. ११ रोजी सकाळी आता ९:३० ते १०:३०  वाजेच्या दरम्यान यावल येथे सातोद रोडवरील माध्यमिक कन्या शाळेत एक महत्त्वाची बैठक होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
        त्या बैठकीत काय काय महत्वाचे निर्णय घेतले जाणार..? जिल्हाधिकारी जळगाव यांनी परीक्षा सुरू होण्याच्या आधी कॉपी करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे प्रसिद्धी माध्यमातून जाहीर केले होते आणि आहे, आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यात कॉपी केंद्रावर कॉपी करणाऱ्या विरुद्ध कारवाया सुरू झाल्याने आता यात परीक्षार्थी,विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सामाजिक शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षक संघटना आणि शासन कोणत्या प्रकारे समन्वय साधणार..? किंवा यांच्यावर शैक्षणिक,राजकीय,सामाजिक प्रभाव पडणार आहे किंवा नाही..? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
         शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहण्यासाठी तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आणि शिक्षक- शिक्षकेतर परीक्षा केंद्रप्रमुख यांना कायदेशीर अडचणी यायला नको,त्यांनाच जबाबदार धरले जाऊ नये म्हणून,तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी कॉपी केंद्रावर कारवाई करू नये का..?  याबाबत ठोस निर्णय सुद्धा घेतले गेले पाहिजे असे समाजातील सुज्ञ पालक व नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात