यावल दि.१
भारतीय जनता पार्टी जामनेर शहर कार्यकारणी सदस्यपदी अजय जयराम पाटील यांची नियुक्तीचे पत्र जामनेर येथील माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते एका कार्यक्रमात देण्यात आले.जामनेर शहरातील वार्डनिहाय पक्ष वाढीसाठी ते प्रयत्न करणार आहेत.
महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या आदेशावरुन जामनेर भाजप शहर कार्यकारणी सदस्य म्हणून अजय जयराम पाटील
यांची नुकतीच नियुक्ती झाली.
यापूर्वी पासूनच पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करत होतो. त्यापेक्षा आता अधिक वेळ देऊन शहरातील वार्डनिहाय पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी
माजी नगराध्यक्षा साधना महाजन,जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील,भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक आतिष झाल्टे,शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे,ना.महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी,
कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अजय पाटील यांची नियुक्ती झाल्याने संपूर्ण जामनेर शहरातून ग्रामीण भागातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा