यावल दि.१ ( सुरेश पाटील )
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यावल शहर व यावल तालुका पदाधिकारी,कार्यकर्त्यांची एक बैठक भुसावळ येथे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत यावल शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी राजेभाऊ करांडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या भुसावळ येथील संपर्क कार्यालयात यावल तालुका व शहर बैठक पार पडली तेथे यावल शहर अध्यक्षपदी राजु भाऊ करांडे यांची निवड करण्यात आली त्या प्रसंगी उमेश नेमाडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले तेव्हा उपस्थित युवक जिल्हा अध्यक्ष अरविंद चितोडीया,गुणवंत निळ,रितेश पाटील,जितू सोनवणे, देवकांत पाटील, विनोद पाटील,विलास अडकमोल,आकाश चोपडे, जुगल पाटील,देवेंद्र सोनवणे हे उपस्थित होते. राजूभाऊ करांडे यांची नियुक्ती झाल्याने यावल शहरातून सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा