यावल दि.२८
काल मंगळवार दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी यावल तालुक्यात ग्रामीण भागातील सांगवी खुर्द येथे विद्यार्थ्यांच्या मनाची मशागत करण्याचा उपक्रम पार पडला.या कौतुकास्पद उपक्रमाचे विद्यार्थ्यांचे पालक आई-वडिलांकडून स्वागत करण्यात येते.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती तसेच मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील यावल तालुक्यात सांगली खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथ.शाळेत 'काव्यजागर 'हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या वर्षी सुप्रसिद्ध बाल साहित्यिक आदरणीय माया धुप्पड यांच्या विविध बाल कविता संग्रहातील कवितांचा जागर अशी संकल्पना घेऊन शाळेतील उपशिक्षिका सौ.जयश्री काळवीट मॅडम यांनी या उपक्रमाची आखणी केली. त्यांना मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील यांचे सहकार्य लाभले.
कवयित्री माया धुप्पड मॅडम,( जळगाव ) सुप्रसिद्ध कवयित्री सौ.संध्या भोळे मॅडम (भुसावळ), जी. एल.पाटील सर ( मुख्याध्यापक एल.एम.पाटील विद्यालय राजोरे ) श्रीमती रंजना सोनवणे मॅडम ( मुख्या.शाळा राजोरे ) आदरणीय श्रीमती संध्या सोनवणे मॅडम ( शाळा राजोरे)
त्यांचे सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत काव्य जागर उपक्रम संपन्न झाला.
सर्व प्रथम रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालत ढोल ताशाच्या गजरात सन्माननीय पाहुण्यांचे औक्षण करून त्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.
ईश स्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावच्या सरपंच आदरणीय ज्योती ताई कोळी यांनी भूषविले.उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यानंतर सौ.काळवीट मॅडम यांनी सर्व पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून दिला.नंतर इयत्ता ३ री,४ थी च्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक या मासिक उपक्रमांतर्गत तयार केलेल्या माहे.जानेवारी २०२४ व फेब्रुवारी २०२४ च्या भित्ती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर इयत्ता १ ली ते ४ थी च्या ४६ पैकी ४० विद्यार्थ्यांनी कवयित्री माया धुप्पड यांच्या कवितांचा जागर त्यांच्यासमोर तबल्याच्या संगीत साथीत केला.काही गोष्टीरूप कवितांची समूह सादरीकरणे देखील झाली.
त्यानंतर शाळेतील इयत्ता 3री,4थी च्या काही विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केल्या.गावच्या सरपंच आदरणीय ज्योती ताई कोळी यांनी देखील उत्स्फूर्त पणे एक सुंदर भावपूर्ण कविता सादर केली.
त्यानंतर मुख्या . श्रीम.वैशाली पाटील मॅडम व सौ.काळवीट मॅडम यांनी कविता सादर काव्य जागर उपक्रमात सहभाग नोंदवला.
आदरणीय मायाताई धुप्पड यांनी आपल्या ओघवत्या वाणीने अनेक सुमधुर कविता ऐकवत विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी आजीच्या मायेने जिव्हाळ्याचा संवाद साधला.
त्यांनी काव्य जागर या उपक्रमाचा हेतू आवडल्याचे सांगत शाळेतील दोन्ही
शिक्षिकांचे व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मराठी भाषा ही आपली आई आहे आणि तिला जगवण्याचे,वाढवण्याचे काम शाळेतील शिक्षिका करत आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले.आपल्या कवितांना हे इतके छोटे विद्यार्थी मुखोदगत,
तालासुरात,योग्य वाचिक अभिनय करत सादर करत आहेत हे पाहून आदरणीय माया धुप्पड मॅडम अगदी भारावून गेल्या. कवयित्री सौ.संध्या भोळे मॅडम भुसावळ यांनी विद्यार्थ्यांच्या या सुंदर आविष्काराचे तोंड भरून कौतुक केले.त्यांनी भित्तीपत्रक उपक्रम अतिशय आवडल्याचे सांगत त्यात लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन बक्षीस दिले.
तसेच उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्याना कॅडबरी चॉकलेट बक्षीस दिले.
आदरणीय संध्या भोळे मॅडम यांचे मन: पूर्वक धन्यवाद!
राजोरे शाळेच्या मुख्या. आदरणीय रंजना सोनवणे मॅडम यांनी कार्यक्रम आवडला म्हणून विद्यार्थ्यांना रुपये १०० बक्षीस म्हणून दिले.माया धुप्पड मॅडम यांनी त्यांच्या कवितांची अतिशय उच्च दर्जाची पुस्तके प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला भेट म्हणून दिली.आदरणीय माया धुप्पड मॅडम यांचे मन: पूर्वक धन्यवाद! मानण्यात आले.
कार्यक्रमाला राजोरे गावचे कलाकार आशिषदादा यांची तबल्याची साथ लाभली
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ.जयश्री काळवीट मॅडम यांनी केले तर आभार मुख्या. श्रीम.वैशाली पाटील मॅडम यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा