बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

यावल दि.२९
बुधवार दि.२८ रोजी डॉ. सी.व्ही.रमण यांनी १९२८ रोजी रमण प्रभावाचा शोध लावला होता.त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे दरवर्षी भारतामध्ये हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे महत्त्व म्हणून यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. 
       कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था अध्यक्ष महेशभाऊ वाणी यांच्या हस्ते करण्यात आले,प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान मंडळाचे यावल तालुका अध्यक्ष डॉ.नरेंद्र महाले सर, कार्याध्यक्ष नितीन बारी सर यांनी भेट देऊन विज्ञान मॉडेल बद्दल विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करून उत्साह वाढवला.यात प्रथम क्रमांक आर्या गडे, द्वितीय क्रमांक पियुष बारी, तृतीय क्रमांक दिव्या गजऋषी यांची निवड करून पाहुण्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी व अतुल गर्गे यांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनाने करण्यात आला. शाळेच्या विज्ञान शिक्षिका सौ.सविता वारके व प्रशांत महाजन सर यांनी शाळेच्या शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विज्ञान मॉडेलची मांडणी केली. शाळेतील सर्व विद्यार्थी व काही पालकांनी विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन विज्ञान दृष्टिकोन वृद्धिंगत केला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात